tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post1755623185891574604..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: २३७. हे किती काळ चालणार?aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-81237809385827159702016-06-10T09:56:58.898+05:302016-06-10T09:56:58.898+05:30अगदी आता कुठेतरी जाऊन लागला हा प्रसंग. अशी काही कु...अगदी आता कुठेतरी जाऊन लागला हा प्रसंग. अशी काही कुटुंबे आसपास पूर्वी पाहिली आहेत. प्रवासातही पहिली असवित. एक स्त्री म्हणून मलाच हे सहन करणाऱ्या स्त्रियांबद्दल आपुलकी/दया वगैरे वाटण्याऐवजी थोडा संताप येतो. आपण असं पहिल्यांदी केव्हातरी नमतं घेतलं तिथेच ही लढाई आपण हरतो मग एका स्टेजला आपणच काही बदल करू शकत नाही. आता तुमच्या वरच्या उदा.मधली मुलगी आज बाबासमोर बोलत नसली तरी तिने स्वतंत्र आयुष्यात नवरा किंवा इतर पुरुषांसमोर कारण नसताना नमतं घ्यायचं टाळलं किंवा ती ते करू शकली तर बरं असं वाटून गेलंअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-88274335608871742902016-05-26T23:31:56.383+05:302016-05-26T23:31:56.383+05:30तुम्ही जे वागणं इथे लिहिलं आहे तसं वागणाऱ्या स्त्र...तुम्ही जे वागणं इथे लिहिलं आहे तसं वागणाऱ्या स्त्रीला मुळात मला असं वागायचं नव्हतं पण वागायला भाग पडतं आहे असं वाटतं का? तुम्ही म्हणता त्या परिस्थितीवर उपाय म्हणजे घडत्या वयातच एक व्यक्ती म्हणून जडणघडण व्हायला हवी. मी कसं वागावं ह्याच्या अपेक्षांचे स्टिरीओटाइप्स माझं वागणं ठरवणार नाहीत हे रुजायला हवं. पण अनेक मुलींच्या बाबतीत शिक्षण हे केवळ त्यांना उपयुक्त आणि श्रीमंत नोकर बनवणे, त्यातून तसाच जोडीदार मिळवणे आणि संततीची बेगमी करणे ह्याचसाठी कामाला येते. स्वातंत्र्य ही एक कडू गोष्ट आहे. ते वापरताना अनेकांना दुखावल्याचे व्रण घ्यावे लागतात हे आपण तरुण लोकांना सांगतो का? आपण त्यांना केवळ पोटभर ओरपायचे आणि आपल्या नातवंडाच्याही ओरपाण्याची सोय करणे हेच काय ते जीवितध्येय असे शिकवतो. Anonymousnoreply@blogger.com