ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, May 23, 2009

५. अनिलांचा ’पाऊस’

काल परवा पुण्यात आमच्या भागात वीज आणि ढग यांच्या दंगामस्तीसह पाऊस आला....
अशा वेळी मला हमखास अनिलांची "पेर्ते व्हा" या संग्रहातली ही कविता आठवते...

येत हा पाऊस येत पाऊस
मातीचा सुटला मस्त सुवास

झंझावात वाहे उठे वादळ
आभाळास मिळे प्रुथ्वीची धूळ

मेघांनी भरून आकाश वाके
भूमीस आपल्या छायेत झाके

अवचित लवे वीज साजिरी
होतसे मीलन अश्रूंच्या सरी

गरजे बरसे आसुसलेला
पहिला पाऊस उल्हासलेला

आला हा पाऊस आला पाऊस
मातीचा भरला उन्मत्त वास....