ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, May 23, 2009

५. अनिलांचा ’पाऊस’

काल परवा पुण्यात आमच्या भागात वीज आणि ढग यांच्या दंगामस्तीसह पाऊस आला. अशा वेळी मला हमखास अनिलांची "पेर्ते व्हा" या संग्रहातली ही कविता आठवते. 

येत हा पाऊस येत पाऊस 
मातीचा सुटला मस्त सुवास

 झंझावात वाहे उठे वादळ 
आभाळास मिळे पृथ्वीची धूळ 

 मेघांनी भरून आकाश वाके
 भूमीस आपल्या छायेत झाके 

अवचित लवे वीज साजिरी 
होतसे मीलन अश्रूंच्या सरी 

गरजे बरसे आसुसलेला 
पहिला पाऊस उल्हासलेला

आला हा पाऊस आला पाऊस 
मातीचा भरला उन्मत्त वास.

2 comments:

  1. पावसाळी वर्णनात 'होतसे मीलन अश्रूंच्या सरी', हे वाचून कविता एकदम वेगळी वाटली.

    ReplyDelete
  2. हो... कदाचित दीर्घ प्रतीक्षेनंतरचे मीलन असते ...म्हणून?

    ReplyDelete

पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.