म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत.
आज सांजच्याला आले तवा हासत व्हते.
म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं
का!”
ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत.
“तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली.
आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”.
बाबौ! आता कायबी कराया येतंय.
कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा.
पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु.
अब्यास कर, सुद्द बोल,
भांडू नको, श्या दिऊ नको,
पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड.
गंपतीचं भजन म्हन.
घरात आय, साळंत हे. हैतच.
पोरपोरी हस्त्येत.
रडू रडू होतंय मला.
येशीतल्या मारोतीरायाला दोन रुपैचा नौस बोलून आलेय.
“द्येवा, माजीबी बदली कर” म्हनूनशान!
*शतशब्दकथा
Just awesome! Brought smile on face. The little girl is so adorable dear. Thanks for this cute character :)
ReplyDeleteक्षिप्रा, :-)
Deletefantastic.......read 2 times.......feelings of a little girl are......speechless
ReplyDeleteअश्लेषा, एकदम मौनात? हं!!
Deletemasta :-)
ReplyDeleteसविता मस्त. फक्त काही ठीकाणी ही छोटी ’ण’ ला ’न’ म्हणते आणि काही ठिकाणी व्यवस्थित ’ण’, ते दुरुस्त करावं लागेल.
ReplyDeleteमोहना, निरीक्षण बरोबर आहे. पण ही एक 'कथामालिका' आहे. इथं आणि इतर कथांमध्येही उल्लेख आल्यानुसार आन्जीच्या घरातले सगळे 'शुद्ध' बोलत आहेत - त्यामुळे तिच्या भाषेत दोन्ही प्रकराचे शब्द दिसताहेत.
Deleteआवडलं. छोटुकलीची गंमतशीर व्यथा... :)
ReplyDeleteभानस, :-)
Deletechhan...mastach!!! :) tya mulicha antarang chhan ulgadlay...agdi mojkya shabdat
ReplyDeleteश्रीराज, 'शतशब्दकथा' हा एक प्रयोगच आहे. बघू कसा जमतोय ते!
Delete:)
ReplyDeleteआभार.
Delete:D
ReplyDelete:-)
Delete