उंच स्टुलावर चढून घरातले पंखे, माळे... पूर्वी मी अनेक वर्ष साफ केले आहेत. पण आता ते काम करता येईल असं वाटेनासं झालं. मग "अर्बन कंपनी"च्या ऍपवर घराच्या सफाईसाठी पैसे भरले.
कंपनीचा तरूण मुलगा आला. वेळेच्या अर्धा तास आधीच आला. तो काय काम करणार ते मला सांगून कामाला लागला. मुलगा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगु (त्याचं कुटुंब मूळचं हैद्राबादचं) अस्खलितपणे बोलत होता. (त्याच्या फोनवरच्या बोलण्यात या भाषा कानावर पडल्या.)
काम संपवून निघताना "पाच स्टार रेटिंग द्या" असा त्याने आग्रह केला. त्याने काम चांगलं केलं होतं, त्यामुळे मी त्याला लगेच पाच स्टार दिलेही.
निघताना मला म्हणाला, "तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगा. तुम्ही काय काम करता?" मी सध्याच्या कामाबद्दल त्याला थोडक्यात सांगितलं. त्यावर तो म्हणाला, "तुम्ही या वयात पुस्तक वाचत बसला होता ते पाहून मला वाटलंच की तुम्ही असं काहीतरी काम करत असणार!"
'या वयात'चा अर्थ 'तुमचं वय झालंय' असा अभिप्रेत असेल, तर तो वस्तुस्थितीला धरूनच आहे.
पण पुस्तकं वाचायचंही 'वय' असतं? असो.
मी वाचत असलेलं "शूद्र मूळचे कोण होते?" हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक मी त्याला उत्साहाने दाखवलं.
मला त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची ते कळलं नाही.
डॉ. आंबेडकर यांची पुस्तकं अमूक एका सामाजिक गटातलेच लोक वाचतात - हे त्याचं गृहितक आहे? का अनुभव?
Hmm.. किती जणांना या पुस्तकाचं नाव तरी माहीत असेल?
ReplyDeleteबोलका अनुभव.😊
ReplyDeleteहे खरं आहे सविता. फक्त ब्राह्मणच नाही तर सगळ्याच उच्च (?) जातींमध्ये आजही आंबेडकरांबद्दल एक अढी, असुया आहे. आवर्जून त्यांची पुस्तकं वाचणारे कमी आहेत.
🙏🏼👌🏼
ReplyDeleteत्या मुलाने एव्हढी उत्सुकता दाखवली आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केला , याचं मला विशेष वाटतं. बाकी त्याची प्रतिक्रिया एक general होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वंचितांचे...तेव्हा उच्यवर्णीय सुद्धा त्यांचे पुस्तक वाचतात,याचे त्याला अप्रूप वाटले असेल.
ReplyDeleteकदाचित त्याला कटू अनुभव सुद्धा आला असेल उच्च वर्णीय लोकांचा यापूर्वी.
🙏🏻तुझे अनुभव , निरिक्षण ...मजा आली .. घरातील अशाप्रकारची कामं मी अजून स्वतःच करते ..🥱😜🤣
ReplyDeleteविचार करावे असे 👍🏼
ReplyDelete👍🏼👍🏼
ReplyDeleteअजूनही जात नाही ती जात 😥
ReplyDeleteफार छान!! माला डॉ आंबेडकर बद्दल आदर आहे पण मी काही त्यांच् एकही पुस्तक वाचलेले नाही
ReplyDeleteशेवटी तुला पडलेला प्रश्न हा खरंच एक मोठं संशोधन व्हावं असा विषय आहे!
ReplyDeleteदोन्ही असावे म्हणजे गृहितक पण आणि अनुभव पण.
ReplyDelete