ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, January 5, 2012

१०७. काही कविता: १८

जाग आली 
तेंव्हा व्यक्त 
बहराची रास; 
              
               पेटलेले काही
               विझे, हळुवार
                झाले श्वास;


भाव आहे
म्हणूनच
क्षणोक्षणी भास; 
                
                जग बुडताना
                उरे अल्प 
                जगण्याची आस;  


खूण नाही 
काही मागे,
असा रोजचा प्रवास; 
           
             मैत्र तुझे माझे 
             त्याने नवे
             निर्मियले पाश. 


पुणे, २४ नोव्हेंबर, २००४ 

16 comments:

 1. सविता ताई..... तुमची कविता आवडली.काही नवे शब्द आणि खूप सारा अर्थ.काही कविता खूप सोप्या वाटतात,शब्द नेहेमीचेच असतात. काही कविता खोल हृदयातून आल्यासारख्या,शब्द घेऊन येतात.विचार करत अर्थ लागतो आणि त्यातच खरा आनंद मिळतो.तुमची कविता विचार करायला भाग पाडते.ह्या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप सारया शुभेच्छा!!!

  ReplyDelete
 2. जग बुडताना उरे अल्प जगण्याची आस
  Bhawook Kaveeta

  ReplyDelete
 3. खूण नाही
  मागे काही
  असा रोजचा प्रवास...

  कुठेतरी किंचित हळहळीचा भाव उमटत असतानाच लगेच पुढे आलेला तटस्थपणा... अन पुन्हा उत्सुक नवीन पाशासाठी...

  नेमके भाव ! :)

  ReplyDelete
 4. श्रिया,
  आता तुला श्रिया म्हणायचं की मोनिका हा एक नवाच संभ्रम :-)
  कवितेच हे एक मला आवडत .. ज्याला/जिला जशी ती भावते तशी ती उलगडते .. ती कुलुपबंद नसते तर एखाद्या खुल्या मैदानासारखी असते .. तिथून आपण आपल्याला जमत तस क्षितीज ठरवू शकतो!

  ReplyDelete
 5. एस एम, भावूक हे तर बरोबरच .. कदाचित अतिभावूकही!

  ReplyDelete
 6. भाग्यश्री, जुन्यात कितीही तटस्थपणा आला तरी मनाला नव्याची आस ही कायमच असणार .. त्यातला फोलपणा जाणवूनही :-)

  ReplyDelete
 7. सविता ताई,मी'श्रिया'ह्या नावाने लिहिते पण काही वाचकांनी खरे नाव देखील टाकावे अशी सूचना केली म्हणून हा प्रयोग.....:P

  ReplyDelete
 8. सुंदर आतिवास! तुझ्या भक्तगणात आता मी ही सामील झालोय हं :D

  ReplyDelete
 9. श्रिया, तुझ हेच नाव माझ्या जास्त ओळखीच असल्याने मी आपली तुला श्रियाच म्हणत जाईन :-)

  ReplyDelete
 10. श्रीराज, स्वागत आहे..
  पण भक्तगण? मग मला 'wrong number' अस म्हणाव लागेल :-)

  ReplyDelete
 11. तुला हसवण्याचा प्रयत्न केला... निष्फळ ठरला वाटतं. माझा हाच प्रॉब्लेम... माझ्या विनोदावर मी सोडून कुणीच हसत नाही :(

  ReplyDelete
 12. श्रीराज, अरे हसले होते मी .. शेवटी ती स्मायली नव्हती का? असो, पुढच्या वेळी आधीच हसेन म्हणजे झाल ..

  आपण बहुतेक भाग्यश्री आणि अनघाच्या ब्लॉगवर असतो वाचक म्हणून .. त्यामुळे आपलीही ओळख असल्यासारखं वाटतय! बाकी गप्पा मेलद्वारे मारू..

  ReplyDelete
 13. अय्यो... सुंदर कविता.. मोजक्याच शब्दां बांधलीये, त्यामुळे अजून परिणामकारक !

  ReplyDelete
  Replies
  1. संकेत, काही गोष्टी व्यक्त करण्यासाठी आपण कविता हे माध्यम नेमक का निवडतो या प्रश्नाच उत्तर अद्याप मला मिळालेलं नाही :-)

   Delete
  2. मी ’निवडत’ वगैरे नाही.. मला कविता सुचते.. आता ती का सुचते, कशी सुचते नक्की सांगता येणार नाही. एखादा विचार आपोआपच कवितेच्या रुपात बाहेर पडतो. कधीकधी मात्र मी ठरवून कविता ’पाडतो’ , त्यामागे कारण वेगळे असते, कोणाची उडवायची असते, कोणाला हसवायचं असते आणि कधीच उग्गाच मित्रांसोबत बसून वेळ घालवतांना.. थोडक्यात मी माझ्या पाडलेल्या कवितांमागचे कारण देऊ शकतो . जेव्हा कविता सुचते त्यामागचे कारण कदाचित एखादा मानसशास्त्राचा अभ्यासकच देऊ शकेल.

   Delete
 14. कविता 'सुचते' याबाबत दुमत नाही .. नेणीवेत यावेळी कविता लिहायची, यावेळी लेख लिहायचा - तो विनोदी लिहायचा की गंभीर करायचा वगैरे - निर्णय कसे होतात हे कुतुहल आहे मलाही. आपल मन आपल्याला कळत नाही .. मानसशास्त्रज्ञ काय सांगणार अस मला वाटत. मन आजारी असेल तेव्हाची गोष्ट वेगळी पण मनाच्या सर्जनशक्तीचा वेध त्यांना घेता येईल का अशी मला शंका येते.

  ReplyDelete