ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, January 26, 2012

११०. पडले तरी ...

फोन वाजला. गप्पा सोडून बाहेर गेले. 
एक फोन, त्यातून दुसरा, त्यातून तिसरा असं करत मी चांगली अर्ध्या तासाने आत आले. 
मी आल्यावर क्षणभर शांतता.
अंदाज होताच मला, तरीही मी निरागसपणे विचारलं, "काय बोलत होतात एवढ?" 
"मी आल्यावर शांत  का झालात?" हा मी स्पष्ट न विचारलेला प्रश्न अगदी स्पष्ट होता. 
"तुझ्याबद्दलच बोलत होतो अर्थात" धनश्री म्हणाली.
मी अनेक किस्से देते त्यांना बोलायला त्यामुळे त्यात मला काही नवं नव्हत, त्यांनांही नव्हत! 
आज मी चुकीच्या ठिकाणी उतरले होते. जागेची खात्री न करताच चारचाकी सोडून दिली होती.  
मग रिक्षावाले नाही म्हणाले  - कारण मला बरोबर विरुद्ध दिशेला जायचं होत. 
त्यावर रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याचा पर्याय माझ्याकडे होता.
किंवा त्याहून म्हणजे एक फोन केला तर कोणीही मला तिथवर घ्यायला आलं असत - अगदी आनंदाने.
पण मी चालायला सुरुवात केली.
रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. सुनसान होता रस्ता. 
आजूबाजूला घरं - दुकान नव्हती. माणसही नव्हती. 
एकदम शांतता. 
पण हवा मस्त होती. 
मला चालायला मजा येत होती. 
सामान हातात थोड कमी असत तर चाललं असत - पण त्याने फार काही बिघडत नव्हत.
अशा रीतीने मी पाउण तास उशीरा पोचले होते. 
आणि त्यावरच माझ स्पष्टीकारण जेमतेम देऊन झालं होत, तोवर मी फोनमुळे बाहेर गेले होते.
"तुझा दृष्टिकोन फार सकारात्मक आहे , मला हेवा वाटतो तुझा ..." प्रिया  म्हणाली. 
"आणि कोणत्या अडचणींना घाबरत नाहीस तू" अनुराधा म्हणाली.
"असलं बोलून तुम्ही तिला बिघडवून टाकताय अजून" जयेश एकदम वैतागला होता. 
"का रे बाबा?" अमित बोललाच.
"अरे, ही चुकून भलतीकडे उतरली .. म्हणजे हिला इतक्यांदा इथ येऊनही रस्ता कळला नाहीये..." जयेश म्हणाला. 
"त्यात भर म्हणजे रिक्षा करावी किंवा आपल्याला फोन करावा हे तिला सुचलं नाही. ..." जयेशच चालूच.
"हो रे बाबा, पण मला चालायचं होतच .. कितीतरी दिवसांत मी अशी एकटी चालले नव्हते .. मग घेतली संधी ..." मी त्याला जरा शांत करायचा प्रयत्न केला. 
"तुला अंदाज होता तू किती मागे उतरली आहेस ते?" त्याने माझ्यावर नजर रोखत विचारलं.
"मला वाटल पंधरा मिनिटांत पोचेन मी इथवर .. " मी सांगायचा प्रयत्न केला.
"हेच मला तुझ आवडत नाही ..." आता संतोष खेळात सामील झाला.
"अरे बाबांनो,  माहिती आहे ना तुम्हाला हिचा स्वभाव ...." कीर्ति माझी बाजू घेत म्हणाली. 
"बदलायला नको का हा हिचा स्वभाव?" जयेश  मला आज एवढ्या गांभीर्याने का घेत होता, माहिती नाही. 
मग बराच काळ सगळ्यांनी एकेमेकांना सुनावण्यात गेला. मी शांत होते. मला अशी चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची सवय नाही. एरवी मी विषय बदलला असता .. पण आज मला कोणी दाद देत नव्हत. 
काही काळाने एक गोष्ट - जी बहुतेक जयेश, अमित, संतोष. ऋतुजा. मेघना  मघापासून सांगायचा प्रयत्न करत होते  - माझ्या लक्षात आली. 
एखाद्या प्रसंगात सकारात्मक दृष्टिकोन असण ही बाब वेगळी.
पण मी प्रत्येक प्रसंगातून  - मला काहीतरी शिकायला कसे मिळालं, मला त्यात कशी मजा आली  यावरच लक्ष केंद्रित करत असते!  हा माझा एक स्वभाव बनला आहे. 
ज्याच वर्णन आणखी एका प्रकारे करता येईल. ते म्हणजे 'पडले तरी नाक वर...' 
सकारात्मक दृष्टिकोनाच्या गोंडस नावाखाली मी केवळ बदलायला नकार देत आहे असं नाही तर मी माझ्या अहंकाराला पण खतपाणी घालते आहे. 
मी हसून म्हणाले, "बरोबर. एकदम कबूल. मला माझा स्वभाव बदलायला पाहिजे हे मला पटलं आहे ..." 
त्यावर सगळ्यांनी निश्वास टाकला.
त्यांचा आनंद क्षणभरच टिकला पण.
कारण पुढच्याच क्षणी मी मूळ पदावर जात म्हणाले, "आता यावर एक लेख लिहायला हरकत नाही ...." 

11 comments:

  1. हा हा...एक साध तत्व आहे न आपली चूक मान्य करणे किंवा थोड स्वत:ला न बदलाने पण आपण बरेचदा असे स्वत:च्या मताला धरून राहतो त्याने झाला तर पहिले आपलाच तोटा होतो...
    हसत खेळत समजावण्याची पद्धत आवडली...मस्त लेख...

    ReplyDelete
  2. हा हा हा... आणि लिहिलाच लेख....

    चला लेख तरी लिहायला मिळाला...!

    ReplyDelete
  3. पण हे आपण असे नेहमीच करत असतो नाही का गं...? प्रत्येकजणच असे करतो... हं.. प्रमाण कमी अधिक असेल इतकच....

    ReplyDelete
  4. अपर्णा, राजेश, श्रीराज,
    आभार.

    ReplyDelete
  5. सविताताई 'सकारात्मकता' हि आजच्या काळाची गरज आहे.खरेतर असे अनेक लहान मोठे धक्के बसत असतात,घटना घडत असतात आजकाल.आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूला पण घडणाऱ्या गोष्टी अनपेक्षित आणि कधी कधी त्रास देऊन जाणाऱ्या पण असतात...आपले रोजचे आयुष्य आणि त्यातले बदल,माणसांशी होणारे वाद आणि सुसंवाद, सगळीकडे आपण सकारात्मक असलो तर नक्कीच इतरांना पण ते आवडते....पण आपलेच म्हणणे खरे करणे हे मात्र थोडे कठीण जाते कारण तो स्वभाव बनून जातो आणि मग आवरणे कठीण जाते...
    तुझा लेख खूप छान आहे पटलं अगदी....

    ReplyDelete
  6. हा हा... गिरे तो भी... :D:D पण बरेचदा चिडचिड न करता प्रसंगाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून आपण पाहू लागलो की अचानक वेगळाच आनंद गवसतो. :)

    बाकी त्यानिमित्ते एक छानसा लेख मला वाचायला मिळाला की!

    ReplyDelete
  7. श्रिया, अति सकारात्मक दृष्टीकोनातून कधी कधी एक प्रकारचा निष्काळजीपणा आणि न बदलण्याची प्रवृत्ती येते .. त्यापासून सावध राहायलाच हवं - नाही कां?

    ReplyDelete
  8. भाग्यश्री, हेच ते .. लेख लिहायला किंवा वाचायला मिळण्याचा आनंद ... 'हम नाही सुधरेंगे':-)

    ReplyDelete
  9. हेहेहे ! स्वभावाला औषध नाही !!
    माझा एक मित्र आठवला. तो दुसर्‍या एका मित्राला म्हणायचा,’तू आपला स्वभाव बदल रे’.. आणि थोड्या वेळात,’ स्वभावाला औषध नाही’ सांगायचा. :)

    अतिसकारात्मकता कधीकधी आपली शत्रू बनते हे मी अनुभवावररून सांगू शकतो. कित्येकदा आपण आपला निष्काळजीपणा, बेफ़िकीरी, वायफ़ळ साहस ’सकारात्मक दृष्टीकोण’ ह्या गोंडस नावाखाली लपवतो.

    ReplyDelete
  10. संकेत, नेमकं हेच म्हणायचं आहे मला!

    ReplyDelete