जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, ती वारंवार सामोरी यावी असा जणू नियम आहे जीवनाचा! निदान MFJच्या आणि माझ्या बाबतीत तरी नक्कीच तसा नियम आहे असा मला नेहमी संशय येतो!
नाही, नाही! MFJ ही कोणा व्यक्तीच्या नावाची आदयाक्षर नाहीत! माणसांना टाळता येण्याची कला थोडी थोडी आत्मसात केली आहे मी अलिकडे. MFJ म्हणजे अनेकांचा अतिशय आवडता आणि माझा तितकासा आवडता नसणारा (ओके, खर सांगायचं तर नावडता!) Mixed Fruit Jam.
महाविद्यालयीन शिक्षणाचा काळ वसतिगृहात गेला. त्यानंतरही मी अनेक वर्ष या ना त्या ठिकाणी Paying Guest म्हणून राहिले. त्याहून जास्त ठिकाणी Non Paying Guest या नात्याने राहिले. थोडक्यात काय, तर बरीच वर्ष मी घराबाहेर होते किंवा कोणातरी दुस-याच्या घरात होते. या काळात भ्रमंतीला जायचं असलं की ‘ब्रेड आणि जाम’ हा सगळ्यात सोपा पदार्थ असायचा न्यायला. कोणाला माझ्यासाठी काही कराव लागू नये भल्या पहाटे उठून म्हणून मी ‘ब्रेड आणि जाम’ आवडण्याच सोंग बराच काळ निभावल! ट्रेक असो, पावसाळी सहल असो, शिबीर असो, अभ्यास दौरा असो, कामानिमित्तचा प्रवास असो – मी नेहमीच सोबत ‘ब्रेड आणि जाम’ घेऊन जात असे. मला खर तर ‘ब्रेड आणि बटर’ आवडत. पण मला आवडत ते फक्त ‘अमूल’ बटर! आणि ‘अमूल’ची वितरण व्यवस्था फारशी चांगली नव्हती पूर्वी. त्यामुळे ते अनेकदा मिळायचं नाही. शिवाय ‘बटर’ वितळत म्हणून ते नेण त्रासदायकही असायचं.
मी घेऊन गेलेला ‘ब्रेड आणि जाम’ खायची वेळ माझ्यावर सहसा यायची नाही. सहप्रवाशांमध्ये ही जोडगोळी आवडणारे कोणी ना कोणी सुदैवाने असायचेच. मग त्यांचा घरचा डबा आणि माझा ब्रेड आणि जाम यांची आम्ही सुखासमाधानाने देवाणघेवाण करायचो. त्यात माझा तिहेरी फायदा होता. एक तर MFJ पासून माझी सुटका व्हायची; दुसरे म्हणजे मला घरगुती आणि चविष्ट पदार्थ खायला मिळायचे; आणि तिसरे म्हणजे MFJ आवडणारे लोक (ते संख्येने खूप असतात ..) माझे मित्र मैत्रिणी बनायचे. मला MFJ आवडत नाही म्हणून त्यांनी वरवर कितीही हळहळ व्यक्त केली तरी त्यांचा भाजी पोळीचा डबा मी संपवायचे म्हणून ते माझ्यावर खूष असत.
स्वत:च्या घरात राहायला आल्यापासून मी एकदाही MFJ किंवा कोणताच जाम विकत आणलेला नाही. ‘मॉल’मध्ये ‘एकावर एक फ्री’च्या घोषणाबाजीत कधी जाम माझ्या सामानात पडला तर तो मी लगेच दूर करते.
यापूर्वीच्या ऑफिसात काम करताना अनेकदा ‘ब्रेकफास्ट मीटिंग’ हा एक कार्यक्रम असायचा. म्हणजे दूर दूरच्या ठिकाणाहून आलेल्या सहका-यांशी बोलायला, चर्चा करायला तेवढी एकच वेळ सोयीची असायची. तिथेही मी ‘ब्रेड जाम’ खात नाही हे कॅंटीनमध्ये काम करणा-या सर्वाना माहिती झाले होते. त्यामुळे मी गेले की ‘अरे, बिना जामवाल्या स्लाईस आण’ अशी सूचना ताबडतोब दिली जायची. जाम न आवडणारे लोक अल्पसंख्यांक आहेत हा शोध मला इतक्या वर्षांनी (!!) लागला होता तोवर!
अस आयुष्य ‘जाम’विना एकंदरीत सुरळीत चालू होत! पण काही महिन्यांपूर्वी माझ्या एका सहका-याने MFJ ची एक बाटली मला भेट दिली. हा सहकारी आदिवासी क्षेत्रात एक Food Processing Unit चालवतो. आणि हे MFJ त्या Unit मधल उत्पादन होत! या बाटलीभर MFJ चं काय करायचं असा मला प्रश्न पडला.
“MFJ ची बाटली ज्यांना कोणाला जाम आवडतो, त्यांना देऊन टाक” असा अतिशय व्यावहारिक सल्ला माझ्या एका मैत्रिणीने दिला. पण मी अनेक बाबतीत अव्यावहारिक आहे – - मला मिळणा-या भेटवस्तू ही त्यातलीच एक गोष्ट! उगीच काही कोणी उठून कोणाला भेटवस्तू देत नाही. भेट देताना त्यामागे देणा-याची /देणारीची भावना असते; नात्याचा एक अदृश्य धागा असतो. मी तो जाणते. म्हणूनच मला मिळालेली भेटवस्तू मला आवडो अथवा न आवडो, मी ती वापरते – न आवडलेली भेटवस्तू कधीच कोणा दुस-याला देऊन टाकत नाही. ‘मला आवडत नाही’ म्हणून दुस-याला काही देणे आणि ‘समोरच्याला आवडते म्हणून’ त्याला /तिला काही देणे यात मूलभूत फरक आहे! माझ्या या स्वभावामुळे मी अनेकदा मला न आवडणा-या रंगाचे कपडे वापरले आहेत; कंटाळवाणी पुस्तके वाचली आहेत; फालतू चित्रपट पाहिले आहेत; एरवी मला कधी गरज भासत नाही अशा चैनीच्या वस्तू वापरल्या आहेत.
असो. तर या MFJ चं काय करता येईल यावर मी बराच विचार केला. अति विचारांचा जो परिणाम असतो तोच इथेही झाला – म्हणजे मी कृती काहीच केली नाही. काही दिवस विचारांत गेल्यावर मी MFJ ला पूर्ण विसरून गेले.
पण आपण दुर्लक्ष केल्यामुळे; समस्या नाहीच आहे अस मानल्यामुळे प्रश्न थोडेच संपतात? मागच्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला आणखी एक आणि आणखी मोठी MFJ ची बाटली दिली. ‘मला MFJ आवडत नाही; माझ्या घरात आधीच एक MFJ ची बाटली पडून आहे’ ही वस्तुस्थिती मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाटलं की मी संकोच करते आहे. “महाबळेश्वरचा प्रसिद्ध जाम आहे हा; एकदा खाल्ल्यावर मला आणखी आणायला सांगशील” अस पूर्ण आत्मविश्वासाने म्हणत तो MFJ माझ्यासाठी ठेवून गेला.
आता माझ्या संग्रहात एक सोडून दोन MFJ आहेत. तो मला आवडत नाही म्हणून तो मी दुस-या कोणाच्या तरी गळ्यात मारणार नाही हे नक्की!
आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा?
जामपासून कोणकोणते पदार्थ बनतात? जामचा पराठा; जामची चटणी; जामचे सरबत – असे काही पदार्थ असतात का? MFJ न आवडणा-यांनी सध्या माझ्याकडे न फिरकणे चांगले. ज्यांना MFJ आवडतो ते येतील अशी खात्री आहेच. दूरच्या गावी राहणा-यांनी फारसे वाईट वाटून घेऊ नये. MFJ पासून सुटकेचा उपाय सांगायला थेट माझ्या घरीच आले पाहिजे असे थोडेच आहे? विचार, कल्पना, युक्ती सुचवायचे आणि संवादाचे इतरही मार्ग आहेतच की अर्थात आपले!
**
एक सोपा उपाय म्हणजे ज्यांना MFJ आवडतो त्या मिर्त्रांची यादी बनव आणि त्यांना घरी get together साठी बोलाव.पार्टी पण होईल आणि MFJ पण संपेल
ReplyDeleteताई...कधी बोलावते आहेस घरी? :D :D :D
ReplyDelete"Just A Minute" ह्या नांवाचा कार्यक्रम IIT मुंबई च्या इनसिंक ह्या कार्यक्रमात का कुठेतरी असायचा... त्यात १ मिनिटात वाट्टेल ते बडबडा... असे असायचे... त्यात "साबण" नावाची १ कथा एका सरदारजीने (की कुणी विद्यार्थ्याने) सांगितली अशी बातमी २-४ दशकांपूर्वी कानांवर आली होती... ती कुठे सापडली तर मिळवून खळखळून हसून घ्या...
ReplyDeleteबापरे एखाद्याला जाम एवढा आ(ना)वडू शकतो याचा कधी विचारच केला नव्हता :)
ReplyDeleteअनामिक/का, MFJ आवडणा-यांना फक्त ब्रेड आणि MFJ असला तरी ती पार्टी वाटेल हे आहेच!
ReplyDeleteयोगेश, कधीही .. म्हणजे MFJ आहे तोवर :-)
मजा, हे शोधायचं कठीणच काम दिसतय .. पण बघू, प्रयत्न करायला काहीच हरकत नाही माझी.
हेरंब, पण कोणता पक्ष आहे तुमचा (आवड की नावड) हे मात्र कळलं नाही :-)
I too don't like MFJ but I am worried about the expiry date of the jams you have.
ReplyDeletehe wachun sare Jam may zalyasarkhe watale. Mansanchya donch categories aahet ase watale; MFJ awadnari ani MFJ n awadnari.
Ashi dhedgujari (MF?) comment lihilyacha khed aahe pan google IME ne asahakar pukarlay tyamule.....
प्रीति, MJF fans असले भोवताली की expiry date चा प्रश्न उद्भवत नाही असा अनुभव :-)
ReplyDeleteI also don’t like any kind of jam so pl arrange different kind of food for the get together for special persons
ReplyDeleteजी गोष्ट आपल्याला आवडत नाही, ती वारंवार सामोरी यावी असा जणू नियम आहे जीवनाचा!
असं मात्र मला नक्कीच वाटत नाही.U expect so U get the things which U do not want
तुम्ही जसा विचार करता तसेच घडत असते
अश्लेशा
आश्लेषा, बरोबर आहे तुझ .. जे आपण मागतो तेच आपल्याला मिळत .. पण मी कधी MFJ मागितल्याच मला तरी आठवत नाही :-)
ReplyDeleteमलापण नाही आवडत MFJ... घरी तर कधीच खात नाही पण ट्रेकला जेव्हा सपाटून भूक लागलेली असते तेव्हा आपोआप जाते पोटात ...
ReplyDeleteसाविताताई ,एक उपाय सांगू ,MFJ ची आवड निर्माण कर मनात आणि ... :)
Deven, will try :-)
ReplyDeleteDid you try MFJ and bread with something else in like peanut butter or almond butter...I am myself not a big fan of sweet sandwich so I put in something else and keep the sweet item on low..
ReplyDeleteI liked one idea that my son once did..
check it out you can reinvent the wheel for yourself...:)
http://majhiyamana.blogspot.com/2010/06/blog-post_12.html