ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, March 7, 2013

१५६. पैला नंबर


आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो.

गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची. 
आमी सर्वे मऊ हून जायचो.
नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा.

म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...”
अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का.

पण मला कटाळा यायला.
सारखी बबली माझ्यासंगं.

कुणी मला खेळायला बी घेईना.
झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच.
हात बी दुखायला लागला. बबली जड लई.

एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं.
जोरात चिमटा काढला बबलीला.
रडली लई. खच्चून.

आता अजाबात येत न्हाई ती माझ्याकडं.

पैला नंबर गेला म्हणा.
जाउंदे.


(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द-  अनुभव मांडण्याचा हा प्रयोग.)

10 comments:

 1. नाय गेला, हाये एक नंबर :-)

  ReplyDelete
 2. लय भारी की वो! :)

  ReplyDelete
 3. :-)
  गोष्ट आवडली.

  अर्थाअर्थी संबंध नाही पण एक सूक्ष्मकथा आठवली.
  http://tagya.blogspot.com/2007/11/blog-post.html

  ReplyDelete
 4. Lai bhari! Amhasni ya aslya gavakadchya goshti lai avadtat baghaa

  ReplyDelete
 5. अनामिक/का, श्रिया, भानस, अनघा, इंद्रधनू, श्रीराज - आभार.
  संहिता/अदिती, रोचक कथा आहे तुम्ही दिलेल्या दुव्यावर.

  ReplyDelete
 6. मस्त आतीवासजी !! एकदम हलका फुलका अनुभव आणि आटोपशीर शब्दरचना!!
  हे वाचून माझ्या एका सहका-याचा अनुभव आठवला, असाच पण शहरी. स्वतःचा दोन तीन महिन्याचा मुलगा रात्री शांत झोपू देत नाही अशी तक्रार घेऊन यायचा. रात्री भूक लागली कि आईला उठवायच्या ऐवजी बाबाला उठवायचा. रात्री खेळायच झालं तर बापाच्या पोटावर वगैरे वगैरे.. आमचा सहकारी रोज डोळे तांबडे करून ऑफिसला यायचा. वैताग करायचा. बसल्या बसल्या झोपा काढायचा. एके दिवशी खुश होऊन आला, लवकर आला.. म्हटलं 'झोप झालेली दिसते', पाहिलं तर डोळे ताम्बडेच होते.. विचारलं तर म्हणाला ' काल पण झोपू नाही दिलं साल्याने.. ऑफिस ला यायला निघालो तर हा (त्याचा पोरगा) डाराडूर झोपला होता.. मला आला राग, उठवलं त्याला आणि एक चिमटा (तुमच्या लेखातल्यासारखाच असावा) काढला.. लागला मोठमोठ्याने रडायला. बायको आणि आई आत धावत आली आणि मी काय केलं ते कळल्यावर मला ओरडायला लागली. मग ऑफिसला आलो!"
  आम्हाला हसावं कि रडावं कळेना!!

  ReplyDelete
  Replies
  1. खरं आहे अखिलदीप, अशा अनेक प्रसंगी आपल्याला हसावं की रडावं हे कळत नाही. पण माणसाच्या उर्मी किती स्वत:भोवती केंद्रित असतात ते कळतं अशा प्रसंगातून!!

   Delete