आमची आई येकदम वाईट.
च्या काय देत नाही कदी.
ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र
न्हाई.
आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.”
त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत
बसली तितचं.
मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव
मोरीत. न फोडता ने.”
आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे
ना! वाईट असली ती तरी!
पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता.
म्या पिऊन टाकला तो गपचिप.
येकदम झ्याक.
तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ...
प्या च्या.....
पावणे नाय आले तर?
म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा
बोलावत्येत” म्हनूनशान.
आई करतेच च्या.
म्याबी पिते.
उलिसा.
गपचिप.
* शतशब्दकथा
हे जर वास्तव असेल तर भयंकर आहे..ओ. आशा आहे कि काल्पनिक असावी. बाकी कथा मस्तच , शब्दा शब्दाला टेन्शन वाढवलत.
ReplyDeleteवय वाढलेल्या माणसांना ‘भयंकर’ वाटतील अशा अनेक गोष्टी लहान मुलं (मुलगे-मुली) करत असतात.
Deleteतुम्ही या आधीच्या शतशब्दकथा वाचल्या नसाव्यात असं दिसतंय. त्या वाचल्यात तर ‘आन्जी’ ही कथानायिका काय आहे याची तुम्हाला चांगलं लक्षात येईल.
आतिवास ताई , तुमच्या शतशब्द कथा वाचल्यात. त्यामुळे तुमची अन्जी चांगलीच माहिती आहे. मी त्या आई , वडलांनसाठी तसं बोललो. ते जर तसं वागत असतील तर हे भयंकर आहे.
Deleteकाही महिन्यापूर्वी असाच तुमच्या ब्लॉग वर आलो होतो आणि त्यावेळी जवळ पास सगळ्या पोस्टस (विवेकानंद यांच्या सोडून) वाचल्या आहेत. पण सध्या ब्लॉग वर जास्त नसतो. पण मीमराठी वर असतो आणि तिकडचं हि तुमचं लिखाण वाचतो बरका. :) छानच लिहिता तुम्ही.
धन्यवाद विशालजी. तुम्ही कधीतरी सवडीने ‘विवेकानंद’ लेखमालाही वाचाल अशी आशा आहे :-)
Deleteखरं तर किती साधी इच्छा आहे ही पण..... :( :(
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteलहान मुलांच्या अपेक्षा बदलत राहतात – त्यामुळे आन्जीची ही सवयही बदलेल
खरंच गं! वास्तव फार भयंकर असतं... :( :(
ReplyDeleteहाहा ! इतकं गंभीर होऊ नका :-)
DeleteAnji ekdum mast ahe..... ekda tari bhitavi kharikhari!
ReplyDelete“अशी एक आन्जी आपल्या प्रत्येकात दडलेली असते” असलं वाक्य टाकायचा मोह होतोय मला ;-)
Delete