ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, May 29, 2013

१६८. बटाटा भाजी

पुन्याच्या आत्याला पोरगी न्हाय.
आत्याची म्या लाडाची हाय.
सुट्टीला पुन्याला नेनार म्हन्ली.

म्या इचारलं, “हिकडं आंबे असत्यात, पुन्याला काय?”
आत्या हसली. मंग हे ते लई सांगितलं तिनं.
तरीबी म्या न्हाई म्हनून रायली.
मंग आत्या म्हन्ली, “बटाट्याची भाजी देईन.”

लई झ्याक बगा.  
आमच्या हित सोमेवाडीच्या बाजारात बटाटा न्हाई. फकस्त कांदे.
म्या इचारलं, “रोज देशील?”
हो म्हन्ली.

मंग म्हैनाभर आत्याची पोरं मला पळवत होती.
पानी दे, चा दे, हे दे, ते दे, याला बोलवून आन.
म्या नाय म्हन्ली की फकस्त “बटाट्याची भाजी” म्हनत, की म्या लागलीच कामाला.

त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली.

आयनं बटाटा भाजी दिली.
म्या नाय खाल्ली. 

7 comments:

 1. छानच होतंय हं हे…दहा ओळींत…रोजच्या आयुष्याचं सार. :)

  ReplyDelete
 2. आता कधी केलीच बटाट्याची भाजी, तर हिची आठवण येईल....

  ReplyDelete
 3. सुंदर! अनघा म्हणाली तसं, मोजक्या शब्दात प्रभावी चित्र उभं केलंय!

  ReplyDelete
 4. मस्तच! मला ही तुझा हा लेखन प्रकार खूप आवडतो!! पण हा प्रकार वाटतो तितका सोपा नाहीये!!! मल तरी नाही जमत बघ!!

  ReplyDelete