मन रंगात रंगले
रंग मनाला लागेना;
भोगताना सारे काही
मन काहीच भोगेना;
आस सावळ्याची नाही
मन आधार मागेना;
जाणायची वेळ झाली
तरी मन हे जागेना.
मन गवसता त्याची
खूण पुसटशी झाली;
खोळ चढवून पुन्हा
नवी पालवी ही आली.
पुणे २६ मार्च २००५,
रंग मनाला लागेना;
भोगताना सारे काही
मन काहीच भोगेना;
आस सावळ्याची नाही
मन आधार मागेना;
जाणायची वेळ झाली
तरी मन हे जागेना.
मन गवसता त्याची
खूण पुसटशी झाली;
खोळ चढवून पुन्हा
नवी पालवी ही आली.
पुणे २६ मार्च २००५,
" खोळ चढवून पुन्हा
ReplyDeleteनवी पालवी ही आली "
वा! ही येतेय नेमाने म्हणून बरे आहे. :)
भाग्यश्री, निसर्गाच चक्र मनालाही लागू पडत ..:-)
ReplyDeleteसविता, आवडली हं कविता !!! :)
ReplyDeleteआभार श्रीराज.
ReplyDeleteनक्कीच गं! मिशिगनमधे तर खासच ! :)
ReplyDelete