मीटिंग संपली.
बाया लगबगीने घराकडे परतल्या.
“माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला.
मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती.
गेले .
चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय. लिवशील?”
तेवढी मदत मी नक्कीच करू शकते.
तिने एक ‘कार्ड’ आणलं.
ती सांगत गेली तसंतसं मी लिहिलं.
नव-याला होतं पत्र.
त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं.
“पत्ता?” मी विचारलं.
“नाय ठावं”, रखमामावशी म्हणाली.
मी चमकून तिच्याकडे पाहिलं.
“कुठलं गाव?” “त्याचं एखादं पत्र?”
मी विचारलं.
मावशी गप्पच.
“मावशे, पत्र पोचणार कसं?” मी म्हटलं.
तिने डोळे पुसले.
तिची लहानगी पोर बाजूला खेळत होती.
ती म्हणाली, “गावात कुणालाबी नाय ठावं आबाचा पत्त्या”.
:(
ReplyDeleteमनातला रावा, मनातला त्याचा ठावा,
ReplyDeleteमनातच राहणार्याला निरोप कसा धडावा ...... :(((