जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय
दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन
समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत
नाही. दूतावासाला फेसबुकवर ‘लाईक’ केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात.
ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी ‘पंतप्रधान
श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद
साधतील’ असं फेसबुकवर कळलं. ‘अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा’ असंही एक आवाहन जाहीर झालं. मग मी दूतावासाशी
संपर्क साधला.
ऑगस्टच्या अखेरीस पंतप्रधानांच्या भेटीची तारीख जाहीर झाली. ६
सप्टेंबर रोजी पंतप्रधान यांगोंमधल्या Thuwunna Indoor Stadium (तुवन्ना स्टेडियम) मध्ये जनतेशी संवाद साधतील
असं जाहीर झालं. या स्टेडियमची आसनक्षमता बत्तीस हजार आहे (Economic Times च्या पाच सप्टेंबरमधल्या बातमीनुसार मात्र ही
क्षमता आठ हजार आहे.) आणि एरवी या स्टेडियममध्ये ‘युवा
क्रीडा प्रशिक्षण केंद्र’ चालतं. इथं फुटबॉलचे सामने होतात, ऍथलेटिक्सच्या
स्पर्धा होतात. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेतले फुटबॉल सामने इथं झाले होते.
स्टेडियम अद्ययावत आहे असं ऐकून होते. म्यानमामध्ये फुटबॉल सामन्यांना स्त्रिया
हजेरी लावत नाहीत, त्यामुळे माझंही तिथं अद्याप जाणं झालं नव्हतं.
१ सप्टेंबर रोजी दूतावासाकडून आमंत्रण पत्रिका आली.
प्रत्येक
व्यक्तीला एक आमंत्रण क्रमांक दिला होता. गंमतीची गोष्ट अशी की दूतावासाकडं माझे
दोन इमेल पत्ते होते – पर्यायी पत्ता त्यांनीच मागितला होता, त्यामुळे दोन पत्ते
होते. मला या दोन्ही पत्त्यांवर आमंत्रणं आली आणि दोन्ही ठिकाणी वेगळे आमंत्रण
क्रमांक होते. एक क्रमांक होता १२००० + तर दुसरा होता
२३,००० +. इतके लोक भाषण ऐकायला खरंच येणार होते की नंबर
दहा हजारपासून द्यायला सुरूवात केली आहे – असा एक प्रश्न मनात आला. पण गर्दी
असण्याची शक्यता भरपूर आहे कारण यांगोंमध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे
म्यानमा नागरिक मोठ्या संख्येने आहेत.
पंतप्रधानांचं भाषण मी अलीकडं फारसं ऐकत नाही. शिवाय या सरकारने
घेतलेल्या अनेक निर्णयांचं मी समर्थन करत नाही. वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला मी
इमेल करून माझी विरोधी मतं कळवलेली आहेत. (त्या विरोधी मतांना
पंतप्रधान कार्यालय काही दाद देत नाही हा भाग वेगळा!) हे
ज्यांना माहिती आहे त्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी पंतप्रधानांचं भाषण ऐकायला
चालले आहे याबद्दल आश्चर्य वाटत होतं. माझी भूमिका स्पष्ट आहे (होती आणि राहिलही).
मी सध्या यांगोंमध्ये राहते आहे. भारतीय पंतप्रधानांचा यांगोंमध्ये जाहीर
कार्यक्रम आहे. मी त्याला जात आहे कारण ते आपल्या देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान
आहेत. अन्य कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान असते आणि त्यांच्या निर्णयांना माझा
कितीही विरोध असला असता तरीसुद्धा मी भाषण ऐकायला गेलेच असते आणि जाईनही. आपले
आपापसात कितीही मतभेद असले तरी आपण ‘एक’ आहोत, आपण एकमेकांचे शत्रू नाही याचं भान जपणं महत्त्वाचं
आहे.
‘अरे वा, मोदी
साहेबांना मानलं पाहिजे. चीनचा धोका लक्षात घेऊन म्यानमाला भेट देण्याची दूरदृष्टी
दाखवणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ना ते’ असे गौरवोद्गार
दोन-तीन लोकांनी काढल्यावर मी चकित झाले. मोदींनी काहीही केलं तरी अनेक भारतीय
लोकांना ‘हे पहिल्यांदाच घडतं आहे’ असं वाटतं. (सोशल मीडिया झिंदाबाद किंवा जनतेची
विस्मरणशक्ती झिंदाबाद!) पण भारत आणि म्यानमा यांच्यात गेली अनेक वर्ष
सातत्याने ‘स्टेट विजिट्स’ होत
आहेत.
विद्यमान पंतप्रधानांची ही काही पहिली म्यानमा भेट नाही, स्टेट विजिट
मात्र पहिली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये आसिआन (ASEAN- Association of South-East Nations) आणि अन्य
बैठकांच्या (ASEAN Summit
and Related Summits) निमित्ताने श्री.
मोदी म्यानमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी नेपिटॉ (Nay Pyi Taw) या राजधानीच्या शहरात सुमारे तीनशे भारतीय
नागरिकांशी संवादही साधला होता. किंबहुना म्यानमाला भेट देणारे मोदी काही पहिले
भारतीय पंतप्रधान नाहीत, ते पाचवे पंतप्रधान आहेत. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी म्यानमाला भेट दिली होती. मे २०१२ मध्येही डॉ.
सिंह म्यानमात आले होते. उपराष्ट्रपती श्री.
हमीद अन्सारी २००९ मध्ये आले होते तर राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्च २००६
मध्ये तीन दिवसांच्या म्यानमा दौऱ्यावर आले होते.
श्री. राजीव गांधी १९९८७ मध्ये बर्मात (बर्माचं
म्यानमा असं नामांतरण १९८९ मध्ये झालं.) येऊन गेले. तत्पूर्वी श्रीमती इंदिरा
गांधी जून १९६८ आणि मार्च १९६९ अशा दोनवेळा बर्मामध्ये येऊन गेल्या आहेत.
त्याच्याही आधी श्री. लालबहादुर शास्त्री १९६५ मध्ये आले होते तर श्री. नेहरू १९५४
मध्ये आले होते.
फेब्रुवारी २०१३ मध्ये लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भारतीय
खासदारांच्या शिष्टमंडळाने म्यानमाला भेट दिली होती. श्रीमती सुषमा स्वराज २०१७ मध्ये आल्या होत्या तर
श्री अजित डोवल २०१५ मध्ये आले होते. श्रीमती निर्मला सीतारामनही येऊन गेल्या
आहेत. अशा भेटींची मोठी यादी देता येईल.
म्यानमा (बर्मा) नेत्यांच्याही अनेक भारतभेटी झाल्या आहेत. जुलै २०१७
मध्ये म्यानमाचे लष्करप्रमुख मी आँग लाय (Min Aung Hlaing) आठ दिवसांच्या
भारतभेटीवर आले होते. म्यानमाच्या परराष्ट्रमंत्री आणि स्टेट कौन्सेलर आँग सान सू
ची (Aung San Suu Kyi) ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन दिवसांच्या भारत
दौऱ्यावर आल्या होत्या. ऑगस्ट २०१६ मध्ये म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष ठिन च्यो (Htin Kyaw) भारतात येऊन गेले. लष्करप्रमुख तान् श्वे (Than Shwe) (तान हा शब्द चुकीचा आहे खरं तर – Tha चा उच्चार देवनागरीत कसा करायचा ते मला माहिती
नाही) हे २००४ मध्ये आणि जुलै २०१० मध्ये भारतात आले होते. ऑक्टोबर २०११ आणि
डिसेंबर २०१२ मध्ये म्यानमा राष्ट्राध्यक्ष तै सै (Thein Sein) भारतभेटीवर आले होते. १९८० मध्ये ने विन भारतात येऊन गेले.
साधारणपणे प्रत्येक स्टेट विजिटमध्ये दोन-तीन करार होतात असं दिसतं. उदाहरणार्थ
डॉ. सिंह यांच्या २०१२ च्या भेटीत बारा द्विपक्षीय करारांनर सह्या झाल्या. म्यानमा
आणि भारत यांच्यात आजवर किती करार झाले हे शोधायला लागेल.
१९८७ ते २०१२ या कालखंडात फारशा भेटी झाल्या नाहीत हे खरं, पण त्याला
ऐतिहासिक कारणं आहेत. म्यानमामध्ये १९६२ मध्ये लष्करी उठाव झाला होता आणि त्यानंतर
थेट २०१६ मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं (निवडणूक नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली)
हे आपल्याला माहिती असेलच. ‘लोकशाही मार्गाने
निवडून न आलेल्या सरकारशी जवळीक निर्माण न करण्याचं’ भारत
सरकारचं धोरण त्या काळात होतं असं वाटतं. लष्करी दडपशाहीमुळे जगाने या काळात
बर्मा-म्यानमाला वाळीत टाकलं होतं हे विसरता कामा नये. याचा पुरेपूर फायदा चीनने
घेतला. आणि हे लक्षात घेऊन की काय पण १९९० मध्ये भारताच्या धोरणात बदल होऊन
म्यानमामधल्या लष्करी सरकारशी भारत सरकारने संपर्क वाढवला.
भारत-म्यानमा संबंधांवर काही लिहिण्याचा मोह टाळून मी परत
पंतप्रधानांच्या भाषणाकडं येते. J
पंतप्रधानांचा म्यानमा दौरा अडीच दिवसांचा आहे. त्यात नेपिटॉमध्ये
म्यानमा सरकारबरोबर अधिकृत बैठका, बगान परिसरात आनंद मंदिराला भेट (२०१६ च्या
भूकंपानंतर या मंदिराच्या पुनरूज्जीवनाचं काम Archeological Survey of India करत आहे) आणि मग यांगोला आगमन. यांगो शहरात
श्वेडगो पगोडा, बोज्या आँग सान म्युझियम आणि संध्याकाळी नागरिकांशी संवाद असा
कार्यक्रम आहे.
दरम्यान दूतावासाकडू उद्याच्या कार्यक्रमाविषयी सविस्तर सूचना आल्या
आहेत. त्यानुसार दुपारी साडेतीनला प्रवेशद्वार उघडेल, खाण्या-पिण्याचे पदार्थ,
कॅमेरा वगैरे गोष्टी आणायला परवानगी नाही (पाणीही नाही), ओळखपत्र आणि दूतावासाचं
आमंत्रणपत्र सोबत आणावं .. वगैरे अकरा सूचना आहेत. साडेसहाला नागरिकांना प्रवेश
बंद केला जाईल आणि सात वाजता पंतप्रधानांचं भाषण सुरू होईल असं दिसतं आहे.
दूतावासाकडून
आमंत्रण आलेल्या सर्व व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून इमेल पाठवण्यात आली. हे
पत्र मात्र मला एकाच इमेल पत्त्यावर आलं J
From:
|
Narendra Modi
<newsletter@narendramodi.in> | Add to Address book |This is not spam
|
|
||
|
||||
To: -------------------
|
...........
|
|||
|
||||
Subject: Namaste from
Narendra Modi!
|
||||
|
||||
Date: Mon, 04 Sep 2017 17:07:23 IST
|
||||
|
|
Note: To help protect your
privacy, images from this message have been blocked.View images | What is this?
|
|
|
|
|||
|
|
Dear
Savita .......Ji,
It is
with great delight and enthusiasm that I begin my Myanmar visit from 5th
September 2017. This two-day visit is my first bilateral visit to Myanmar, a
valued neighbour and a close friend of India’s.
My
visit to Myanmar includes programmes in the historic city of Bagan and
Yangon.
On the
evening 6th September, I will be addressing the Indian community
in Yangon, where I look forward to seeing you.
We take immense pride in our
diaspora, which has made India proud on the global stage. The Indian diaspora
in Myanmar has brought India and Myanmar a lot closer in the past decades.
Do write to me on a specially created
open forum on the Narendra
Modi Mobile App with your thoughts and ideas. I would refer to
some of the ideas received during my speech at the community programme.
See you in Yangon on the 6th!
Yours,
Narendra Modi
|
मी ‘नरेंद्र मोदी’ अॅपवर ‘भारतात शिकणा-या
म्यानमा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने विशेष शिष्यवृत्ती जाहीर कराव्यात’ असं सुचवलं. यातून दोन देशातल्या नव्या
पिढ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील असं मला वाटतं. अशी योजना
अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे मला माहिती आहे आणि त्यातून अफगाण-भारत
संबंध स्थिरावायला मदत होते असं मला अफगाणिस्तानमध्ये आलेल्या अनुभवांवरून वाटतं.
|
Sir, we need to declare special
scholarships for Myanmar students studying in India. It will help to build
bridges between the young generations of both the countries. In addition to
this Myanmar needs a good pool of trained Civil Servants, which will help
strengthening democracy. (via NMApp)
|
माझ्याकडून तयारी सगळी झाली आहे. आता सहा सप्टेंबरची वाट पाहते आहे. :-)
मस्त. भाग २ ची वाट पहात आहे. - योगिता
ReplyDeleteलेख छान details मध्ये आहे. भाषणाचे डिटेल्स वाचायला आवडतिल. - सोनाली
ReplyDeleteI just love your holistic approach always. Very well written and even I am awaiting your reportage of that day :) - Kshipra
ReplyDeleteI hope an announcement is made that Indian Govt. will not deport but take care of the Rohingya's who have fled due to the horrific violence they are facing in Myanmar.- Kishore
ReplyDeleteसहा तारखेचा 'ऑंखो देखा हाल' सविस्तर कळव. - रजनी
ReplyDeleteअरे वा, छान सविस्तर लिहिलं आहेस. राजकीय details बरेच दिले आहेत. मोदींवर फारच नाराज आहेस :-).
ReplyDeleteतुझी सूचना चांगली आहे.
राज्यश्री
Very nice post. I merely stumbled upon your journal and wished to mention that I even have extremely enjoyed browsing your weblog posts. finally I’ll be subscribing on your feed and that i am hoping you write once more terribly soon!
ReplyDeleteखूप छान आणि सविस्तर लिहिले आहेस. कसा झाला कार्यक्रम? भाग २ वाचणार आहे.
ReplyDeleteवंदना
In the novels of Sharat Chandra Chatterjee, there are mentions of Burma. I suppose there was constant traffic between two countries.
ReplyDelete