'अब्द शब्द'ची कल्पना आणि ही कविता यातलं कोण माझ्या मनात आधी आलं हे सांगणं अवघड आहे.....
म्हणून ही कविता या ठिकाणी....
चाल चालले मी
श्वास राहिला पेटता
पाणी उसळले किती
गूढ डोहाने जपता
जाणत्याला सारे भय
तण माजताना रानी
मस्तवाल झाले मी
त्याने तुला काय हानी?
वाया गेले एक तप
पुढे चालू राही धंदा
तुला नाही सुख दु:ख
तू रे पल्याड गोविंदा!
अब्दशब्द खूपच सुंदर. आपल्या आणखी कविता वाचायला आवडतील. शुभेच्छा........
ReplyDeleteआपल्या शुभेच्छांसाठी आभारी आहे. मागचे वर्ष English blog कडे जास्त लक्ष देण्यात गेले.. आता मात्र इकडेही नियमित लिहिन.
ReplyDelete