ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, October 16, 2009

८. काही कविता: ४

थोडे अल्लड, थोडे हुकुमी

नव्हती कधीच कसली ग्वाही;

येता-जाता हसले किंचित

संपून गेले अलगद काही.


आता फुटकळ लागेबांधे

वाहून जरी हे जगणे नेणे;

परिणामांची सीमा लांघून

उरले अविरत - ते माझे गाणे!

१६ आक्टोबर २००९, पुणे, १५.१३

2 comments:

  1. मजा आली हा ब्लॉग वाचताना. मनातलं केवढं काय काय शब्दांत उतरवणं किती कठीण आहे.
    मी बालमोहनला पण ही लिंक पाठवलीय.

    ReplyDelete
  2. English मध्ये आपण Thanks अस सहजपणे क्षणोक्षणी म्हणू शकतॊ.. मराठीत मात्र ते फार कृत्रिम वाटत... नाही का?

    ReplyDelete