ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, May 15, 2014

१९९. दुस्री

म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास.
गुर्जी म्हन्लं ‘आता दुस्रीत’.

म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.”
आयनं हसून श्येंगदानं दिलं.
आज्जीनं गूळ दिला हातात.
आण्णा पेन देनार हायेत.

गावभर हिंडून दारात बसली.
मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली.

आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी.
कायबी कराया गेलं की ‘ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा’ म्हनत्येत.
त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत.
पन सोताला शाने समजत्येत जादा.

म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू. म्याबी दुस्रीत हाये आजपासून!”
राम्या जीब दावत बोल्ला, “आन्जी दुस्रीत, आमी तिस्रीत!”

म्या तिस्रीत जाईल तवा हे चवथीत.
म्हंजे आमी कितीबी आब्यास क्येला तरी हेच पुडं?

*  शतशब्दकथा 

2 comments:

  1. मस्त. मी सध्या ’झोंबी’ वाचते आहे यादवाचं. त्यांची शिक्षणाची धडपड, शाळेतलं वातावरणा याच्यांशी सांगड घातली गेली उगाचच.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मोहना. हो, असं एक वाचताना आपल्याला दुसरंच काहीतरी आठवतं खरं!

      Delete