ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, January 8, 2010

१७. अज्ञेयाचे रुद्धद्वार

काही वेळा शब्दांचा अर्थ लागत नाही पण त्यामागची भावना आपल्यापर्यंत पोचते. हे नेमके कसे घडते ते सांगता येत नाही, ते शब्दांत पकडता येत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही कविता वाचताना मला हा अनुभव आला. एकदा नाही, तर अनेकदा आला. आजही ही कविता मला नीट ’समजलेली’ नाही, पण ही माझी एक आवडती कविता आहे.

आणखी एक मुद्दा. बुद्धिवाद आणि कविता यांचा काही संबंध असतो अस मला कधीच वाटल नव्हत. ही कविता वाचताना कविता म्हणजे नुसता भावनांचा झंझावात असत नाही, तर त्यात विचारांनाही स्थान असते हे मला अगदी पटलेच म्हणा ना!

ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे
येणार घरासी मार्ग त्याची ते सारे

ऐकोनी तुझ्या भाटांच्या
गप्पांसी गोड त्या त्यांच्या
घ्यायासि विसावा माझ्या
जीवासि ये घरी तुमच्या

ठोठावित थकलो! अजुनि नुघडतो बा रे
आंतूनि तुझी ती बंद सदोदित दारे

अशी शॊधाची साद देणारी ही एक वेगळीच कविता. हा शोध घेताना कवी काही शक्यता बाकी ठेवत नाही. तो पुराण कथांचा वेध घेतो, परपरेच्या मांदियाळीत सामील होतो, एकान्तपथाचीही कास धरतो. अगदी अणुंच्या बोगद्यातून हिंडून कवी अनंतत्त्वाचा शोध घेतो.

अखेर कवी म्हणतो,

घर दुजे बांधु देईना
आपले कुणा उघडीना
या यत्न असा चालेना
बसवे न सोडुनी यत्ना

ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपि बा रे
ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे!

कवितेचे फक्त पहिले आणि शेवटचे कडवे येथे आहे. मूळ कविता वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल!

6 comments:

 1. खुप छान विश्लेषण

  ReplyDelete
 2. me he kavita anekada vachali aahe pan mala ti ajunahi umagali nahiy! aata parat ekada try karen.

  ReplyDelete
 3. स्वागत आहे pra तुमचे माझ्या दोन्ही blog वर. हो, मलाही ही कविता समजल्यासारखी वाटते पण खात्री वाटत नाही. तुम्हाला काही सापडल याच्यावर लिहिलेल, तर मला जरूर सांगा.

  ReplyDelete
 4. >>बुद्धिवाद आणि कविता यांचा काही संबंध असतो अस मला कधीच वाटल नव्हत.
  कवितेचा कुठल्याही वादाशी (इझ्म) संबंध असेल? मल नाही वाटत. बुद्धी आणि कविता यांचा संबंध असतो. बुद्धीवादी ज्याला बुद्धी म्हणतात, त्या बुद्धीचा मात्र नसावा.

  ReplyDelete
 5. अनामिक/का, आभार. हं! तुम्ही म्हणती त्या मुद्यात तथ्य आहे.

  ReplyDelete