लेखाचं शीर्षक विचित्र वाटतंय ना? मलाही तसंच वाटतंय - पण पर्याय नाही सध्या सुचत.
अर्थात ते शीर्षक मी जे करते आहे, सध्याचा माझा जो प्रासंगिक छंद आहे त्याच्याशी सुसंगत आहे.
कारण माझ्या लक्षात आलं आहे की मी परत एकदा मेट्रोमध्ये बूट आणि चपला पाहते आहे.
छे! गैरसमज नको. मी माझं नेहमीचं काम सोडून दुस-या उद्योगात पडलेले नाही! मी चपलांच्या दुकानात काम करायला लागलेले नाही आणि नजीकच्या भविष्यात तसं काही करायचा माझा विचारही नाही.
मग मला काय म्हणायचं आहे?
का पाहते आहे मी बूट आणि चपला - तेही इतरांच्या?
'मी दिल्लीत राहते' असं मी सांगत असले तरी मी एका अर्थी 'अनिवासी दिल्लीकर' आहे - जितका काळ मी दिल्लीत असते; तितकाच काळ मी दिल्लीच्या बाहेर असते. प्रत्येक वेळी मी दिल्लीत परत आल्यावर जेव्हा मेट्रोने प्रवास करते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी मेट्रोत इतरांचे बूट आणि चपला पाहते आहे!
हो, मी काय सांगते आहे नेमकी, हे अजूनही नीट स्पष्ट होत नाही ना?
ठीक आहे.
जरा सविस्तरच सांगते आता.
मी बूट आणि चपला का पाहते - त्यामागचा संदर्भ सांगायला हवा नीट. नाहीतर हे काहीतरी नवं खूळ घेतलं आहे मी डोक्यात- असं तुम्हाला वाटायचं!
दिल्लीत असताना रोज ऑफिसला जायला आणि घरी परत यायला मी मेट्रो वापरते - म्हणजे मेट्रोने प्रवास करते रोजचा. मेट्रो खूप स्वच्छ आहे, वेळेत असते, त्यात स्त्रियांसाठी राखीव डबा असल्याने पुरुषांचे धक्के खावे लागत नाहीत गर्दीत आणि वेळही भरपूर वाचतो. त्यामुळे प्रवासाचा शीण असा जाणवतच नाही कधी. हाच प्रवास मी बसने किंवा अगदी चारचाकीने केला असता तर बहुधा एव्हाना मी दिल्ली सोडून गेले असते.
मी ज्या मेट्रो मार्गावर नियमित प्रवास करते, तो भुयारी मार्ग आहे. एकदा पहिल्या मेट्रो स्थानकात मी प्रवेश केला की जिथं पोचायचं त्या मेट्रो स्थानकातून बाहेर पडेपर्यंत माझा आकाशाशी संबंध पूर्णपणे तुटतो. मेट्रो वातानुकुलित असल्याने गाडीचे दरवाजे बंद असतात आणि खिडक्या नाहीतच .. फक्त खिडकीसारख्या मोठया काचा आहेत - त्या उघडत नाहीत. स्थानक आल्यावर मिनिटभरासाठी दरवाजे उघडतात तेव्हा त्यातून समोरचा फलाट दिसतो फक्त - समोरच्या फलाटावर असली तर मेट्रो, त्यातली माणसं असं दृश्य काही क्षण दिसतं आणि पुन्हा दरवाजे बंद होतात.
त्यामुळे मेट्रोने प्रवास करताना मला नेहमी आपण एका मर्यादित जागेत बांधले गेलो आहोत असा अनुभव येतो. आकाश दिसत नाही, झाडं दिसत नाहीत, इमारती दिसत नाहीत - बाहेर फक्त काळोख असतो आणि आतमध्ये माणसांची गर्दी. अशा वेळी मला कशाशी जोडलं जावं हे न कळल्याने माझी अवस्था विचित्र होते. एखादं रोप मुळापासून उखडलं तर खरं, पण त्याला कुठेच रुजवलं नाही तर त्याची जशी अवस्था होते, तशीच काहीशी मी त्या क्षणांत होते. ती पोकळी भरून काढायला मला काहीतरी 'कृती' करण्याची गरज असते त्या वेळी. पण तेव्हा 'पाहण्या'व्यतिरिक्त मी दुसरं काहीच करू शकत नाही. माझी नजर निरुद्देशपणे इतस्तत: फिरत राहते. मग माझ्याही नकळत माझे डोळे एखाद्या स्त्रीच्या चेह-यावर जाऊन थबकतात. अनोळखी व्यक्तींना - मी स्त्री असले आणि त्याही स्त्रियाच असल्या तरी - असं 'पाहणं ' माझं मलाच विचित्र वाटतं. या पाहण्यात कसलाही रस नसतो, कसलाही उद्देश नसतो, काही हेतू नसतो, मी पाहते आहे ही जाणीवही नसते - आणि म्हणूनच असं पाहणं जास्त 'विचित्र' होऊन जातं!
माझी अशी निरुद्देश, निरर्थक नजर कोणावर पडते तेव्हा मिळणारे प्रतिसाद अनेक प्रकारचे असतात. एखादी स्त्री हसते, कारण तीही नेमकी त्याच क्षणी तितक्याच निरर्थकपणे आणि नकळत माझ्याकडे पहात असते. एखादी स्त्री अगदी वैतागते - जे अगदी स्वाभाविक आहे; कारण एका प्रकारे तिच्या खासगीपणावर मी त्या क्षणी आक्रमण केलेलं असतं. एखादी सरळ रागाने बघते माझ्याकडे. आणखी एखादी माझ्याकडे अजिबात लक्ष न देता संगीत ऐकायला लागते किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा सोबतीच्या मैत्रिणीशी बोलायला लागते. एखादी बिचकते तर आणखी एखादी कानकोंडी होऊन दुसरीकडे पहायला लागते. एखादी माझ्याकडे दुर्लक्ष करते तर एखादी मला जणू आव्हान देत आक्रमकपणे माझ्याकडे उलट नजर रोखून पाहते. क्वचित कोणीतरी हवापाण्यासारखा निरुपद्रवी विषय काढून बोलायला सुरुवात करते.
काही स्त्रिया अधिक समंजस असतात - त्या चेह-यावर काहीही भाव न दाखवता डोळे मिटून घेतात. मी जणू तिथं नाहीच, मी जणू त्यांच्याकडे पाहिलंच नाही अशा थाटात त्या त्यांचं काम पुढे चालू ठेवतात. हा सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय असल्याने मी स्वत:ही हा मार्ग वापरते अनेकदा. एखाद्या परिस्थितीवर, प्रतिक्रियेवर आपल्याला काही म्हणायचं नसेल तर डोळे (किंवा कान किंवा तोंड...) मिटून घेणं सगळ्यात चांगलं यात शंकाच नाही. मीही खरं तर मेट्रोत एक डुलकी काढू शकते. पण मी झोपत नाही - कारण आठवायला माझ्याकडे बरंच काही असतं नेहमी. विचार करायलाही बरंच असतं डोक्यात - कामाचं, बिनकामाचं - असं काहीबाही. या रिकाम्या वेळेचा उपयोग करत मला काही आठवायचं असतं आणि काही विसरायचंही असतं! शिवाय सकाळी सकाळीच झोपेत जायचं तर दिवस सगळा झोपाळल्यागत जातो.
पण तरी नजर उगीच इतरांवर पडायला नको म्हणून मी डोळे मिटते - आणि पुढच्याच क्षणी ते पुन्हा उघडते. मेट्रोत सतत काहीतरी उद्घोषणा होताच असतात - अनोळखी लोकांशी मैत्री करू नका; मेट्रोत खाण्या-पिण्याला परवानगी नाही; मेट्रोत खाली फरशीवर बसू नका, पुढचे स्थानक अमुक एक आहे आणि दरवाजा डावीकडे (किंवा उजवीकडे) उघडेल .. हे आणि ते .. सारखं काही ना काही चालू असतं - एक मिनिटही शांतता नसते. प्रत्येक वेळी उद्घोषणा सुरु झाली की माझे डोळे आपोआप उघडले जातात. मला ईअरफोन लावून गाणी ऐकायला आवडत नाहीत. इथं दिल्लीत माझ्या फारशा ओळखी नाहीत त्यामुळे मेट्रोत मला ओळखीचं कुणीतरी रोज भेटेल आणि रोज मी गप्पा मारत प्रवास करेन अशी शक्यता शून्यच. मेट्रोत फोनला रेंज नसते चांगली - त्यामुळे कुणाला फोन करण्याचा किंवा कोणाचे फोन येण्याचा प्रसंग अगदी क्वचित येतो. आणि सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत गोष्टी फोनवर बोलायला मला आवडत नाहीत. प्रवास जेमतेम अर्ध्या तासाचा असतो - पुस्तकं उघडण्यात पण काही अर्थ नसतो फारसा. मग काय करायचं? मी डोळे मिटते , उघडते, पुन्हा मिटून घेते .. पुन्हा उघडते .. हे चालू राहतं अविरत...
डोळे उघडले की मला काय काय दिसतं? मी आधीच सांगितल्याप्रमाणे बाहेर फक्त काळोख असतो, काही दिसत नाही, काही पाहता येत नाही. त्याचवेळी मला आतल्या स्त्रियांच्या चेह-यांकडे पाहणं टाळायचं असतं. या सगळ्यातून मार्ग काढता काढता मग मला एक नवीच सवय लागली आहे - ती म्हणजे डब्यातल्या इतरांच्या - सहप्रवाशांच्या - चपला पहायच्या, त्यांचे बूट पाहायचे! एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा चेहरा पाहताना त्या व्यक्तीला 'कोणीतरी पहात आहे' ही जाणीव होतेच - पण चपला आणि बूट पाहताना मात्र हे काही त्यांना जाणवतही नाही. शिवाय एका नजरेत कितीतरी चपला -बूट मला दिसतात - हाही एक फायदाच म्हणायचा.
आणि आता काही महिने असं निरीक्षण केल्यावर 'पादत्राणांच जग' हे एक अजब विश्व आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते. त्यांचे किती आकार, किती रंग, किती वेगवेगळ्या शैली, किती वेगवेळ्या प्रकारे ती बनवलेली!! काही प्लास्टिकची, तर काही रबराची तर काही चामड्याची! काही चपला, काही बूट, काही फ्लोटर्स, काही सेंन्डल! काही अंगठा असलेले काही नसलेले; काही लेस असलेले तर काही नसलेले; काही एका उभ्या पट्ट्याचे तर काही एकमेकांना छेद देणा-या पट्ट्यांचे!
हे प्रत्येक पादत्राण फक्त खूप काही सांगून जातं - फक्त त्याच्याबद्दल नाही तर ते वापरणा-या व्यक्तीबद्दलही!! मी चपला-बूट पाहून ती व्यक्ती कशी असेल याचा एक अंदाज बांधते - आणि तो खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी त्या स्त्रीच्या चेह-यावर एक नजर टाकते. गंमत म्हणजे अनेकदा माझी त्या व्यक्तीबद्दलची कल्पना खरी ठरते. ही कल्पना कसलीही असते - काय वय असेल, हेडफोन लावून गाणी ऐकत असेल का, केस कसे असतील - काहीही कल्पना करते मी आणि त्या तपासून पाहते. आता मला तुम्हीच सांगा, गुलाबी रंगाचे बूट दिसले, किंवा झेब्रा पटेटे असले चपलेचे, किंवा निळी किनार असलेले लाल रंगाचे बूट असले.............. तर तुमच्या डोळ्यांसमोर एक व्यक्तिमत्व उभं राहणारच ना! बुटाची लेस किती घटट बांधली आहे किंवा किती सैल सोडली आहे यावरून माणूस थोडाफार कळतो असं मी म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती नाही. अर्थात ही फक्त कल्पनाशक्ती नाही - आधीची निरीक्षणं आणि आधीचे अनुभव यांचा आधार असतो असे अंदाज बांधताना.
सुरुवातीला मला असं 'पादत्राणं' न्याहाळताना काहीसा संकोच वाटायचा आणि थोडं अपराधीही वाटायचं. पण हल्ली मला तसं काही वाटत नाही आणि प्रवासात 'वेळ कसा घालवायचा' हा प्रश्न आता उरला नाही माझ्यापुढे. शब्दांशिवायचं ते एक मस्त जग असतं माझं. 'पादत्राण निरीक्षण' हे फक्त मनोरंजन नाही माझ्यासाठी तर माणसांबाबत बरंच शिकण्याची ती एक संधीही आहे. त्यातून मन, विचार, कल्पनाशक्ती यांना चालना मिळते. त्यातून नवी गृहितकं तयार होतात, त्यातून नवी निरीक्षणं होतात आणि पुन्हा नवे सिद्धांत मनात तयार होतात. ते एक चक्र आहे - ते चालू राहतं - भर घालत, काही गोष्टी बाजूला सारत. पण प्रक्रिया मात्र चालू राहते निरंतर.
मला या सगळ्या प्रकारात मनाची फार गंमत वाटते. एखादी परिस्थिती आपल्यावर लादली गेली, त्यातून बाहेर पडायचा काही मार्ग नसला (मेट्रो प्रवासाला मला पर्याय आहेत - पण ते अधिक गैरसोयीचे आहेत हे मला माहिती आहे!) की आपलं मन असलेल्या परिस्थितीत कसं आनंदाचे जगण्याचे आणि शिकण्याचे क्षण आणि संधी शोधतं हे मजेदार आहे. मन एका मर्यादित अवकाशात स्वत:चं जग निर्माण करू शकतं आणि त्यात आनंदाने राहू शकतं - मजेत राहू शकतं - स्वत:ला रमवू शकतं! बाहेरच्या जगासाठी खिडक्या आणि भिंती बंद असल्या तर आपल्या मर्यादित जागेत नवं जग निर्माण करण्याची क्षमता मनात असते याचा प्रत्यय देणारा अनुभव होता हा माझ्यासाठी. . जे काही समोर आहे, जे वाट्याला आलेलं आहे त्याचा अर्थ लावण्याची आणि त्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्याची क्षमता मनात आहे असं या निमित्ताने माझ्या लक्षात आलंय. माझ्या प्रवासाची वेळ अगदी कमी आहे याची मला जाणीव आहे - पण उदया काही कारणान जास्त वेळ मला बंदिस्त अवकाशात काढावा लागला तर काय केलं पाहिजे अशा वेळी याची कल्पना मला आलेली आहे.

'आता यातून काही मार्ग नाही' असं ज्या ज्या वेळी आपल्याला वाटतं, त्यावेळी मनाच्या या क्षमतेला आव्हान देऊन बघायला पाहिजे, मनाला थोडं भटकू दिलं पाहिजे, त्याच्यावर सामाजिक संकेतांचे जे संस्कार आहेत त्यापासून त्याला थोडी मोकळीक दिली पाहिजे - मग बाहेरची परिस्थिती तीच राहूनही मन बदलतं, दृष्टी बदलते आणि जगणंही बदलून जातं!!
आता आयुष्यभर मी काही मेट्रोत पादत्राण दर्शन करत बसेन असं नाही - कदाचित त्याचा मला लवकरच कंटाळा येईल आणि मी नवा काहीतरी खेळ शोधून काढेन. जोवर मला मजा येतेय; माणूस म्हणून माझी समज वाढतेय आणि त्यातून मला काही शिकायला मिळतंय तोवर मी 'काय करते आहे' हे फारसं महत्त्वाचं नसतं - नाही का? - विशेषत: त्याचा इतरांना काहीही उपद्रव नसताना?
हं ... फक्त पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा मी तुमच्याकडे पाहण्याऐवजी तुमच्या चपलांकडे (बुटांकडे) जास्त लक्ष दिलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!
**
पोस्ट वाचली आणि मस्त हसू पसरलं चेहर्यावर. तुला खूप नेमकेपणानं लिहीता येतं. निरीक्षण अफाट आहे. कधीतरी एकदा तुझ्याबरोबर प्रवास करायला आवडेल.
ReplyDeleteलिहीत रहा!
हे फारच छान आहे. आधी पोस्ट वाचताना वाटलं की तुम्ही गर्दीत हरवलेल्या किंवा टाकून दिलेल्या पादत्राणांबद्दल लिहिलं असावं. पण पादत्राणांचे निरीक्षण ही कल्पनाच खूप वेगळी आहे. :)
ReplyDeleteHahahahaha.... Beste he... Mala pan baryachda metro madhun pravas karatana kay karayach ha prashn padato. Tumhi sodavalat to :))
ReplyDeleteसविताताई मस्त हसले वाचताना...हल्ली माझ्या लेकीला शाळेला सुटी आहे,आणि तिलाही वाचनाची आणि लेखनाची आवड आणि सध्या वेळ आहे तिला...हा लेख तिलाही वाचून दाखवला. हसलो दोघी.ती म्हणाली ती पण असे पादत्राणांचे निरीक्षण करते कधी कधी....:) :).तिलाही तुमचे लेखन आवडले.
ReplyDeleteक्षिप्रा, तुला पोस्ट वाचून हसू आलं हे वाचून बरं वाटलं !
ReplyDeleteइंद्रधनू, काय करणार? पर्याय नसल्याने काय काय करावं लागतं माणसाला - त्याचं हे एक उदाहरण!!
ReplyDeleteहेरंब, पहा आणि सांगा मला तिकडचे लोक काय प्रकारची पादत्राणं वापरतात ते! स्त्रियांसाठी तिकडे राखीव डबा नसतो - त्यामुळे तुम्हाला 'स्त्री-पुरुषांची पादत्राणे' असा तौलनिक अभ्यास सहज करता येईल :-)
ReplyDeleteश्रिया, तुझ्या लेकीचे पादत्राण निरीक्षणाचे अनुभव ऐकायला/वाचायला आवडतील नक्कीच. माझ्यासारखं आणखी कोणीतरी आहे हे पाहून बरं वाटलं :-)
ReplyDeleteNice!!!
ReplyDelete'आता यातून काही मार्ग नाही' असं ज्या ज्या वेळी आपल्याला वाटतं, त्यावेळी मनाच्या या क्षमतेला आव्हान देऊन बघायला पाहिजे, मनाला थोडं भटकू दिलं पाहिजे, त्याच्यावर सामाजिक संकेतांचे जे संस्कार आहेत त्यापासून त्याला थोडी मोकळीक दिली पाहिजे - मग बाहेरची परिस्थिती तीच राहूनही मन बदलतं, दृष्टी बदलते आणि जगणंही बदलून जातं!!'....आवडलं.
ReplyDeleteमला हे असं बऱ्याचदा वाटत असतं हल्ली. लेक लग्न होऊन गेली की मी ह्या घरात एकटी बसून नक्की काय करणार आहे...ह्याची तयारी मला करायला हवी...हे असं काहीतरी चालू असतं माझ्या डोक्यात...अधूनमधून ! मी काहीतरी वेगळंच बोलतेय का ??? :)
छान खुसखुशीत लेख आहे. मेट्रोमधला अनुभव परिचयाचाच आणि गंमत म्हणजे माझाही अनुभव जवळपास तुझ्यासारखाच आहे. फक्त मी पादत्राणांपर्यंत मर्यादित न राहता पर्स, कपडे, केशरचना, इ. चेहरा (डोळे) नसलेल्या गोष्टींचे निरिक्षण करत असते. तेवढीच चालू असलेली फॅशन पण कळते ;-)
ReplyDeleteबाय द वे, 'आता यातून काही मार्ग नाही' ही स्थिती फार काळ टिकणारी नसतेच. आपला मानवी स्वभाव काही ना काही तरी पर्याय शोधूनच काढत असतो... किंवा आहे ती पारिस्थिती त्याला सवयीची होवून जाते.
ReplyDeleteसायलीजी, स्वागत आणि आभार.
ReplyDeleteअनघा, तू काहीही 'वेगळ'बोलत नाहीयेस. असे विचार डोक्यात येण आवश्यकच आहे माझ्या मते ..!
ReplyDeleteस्मिता, कुठे आहेत ते तुझे अनुभव? :-)
ReplyDelete<< तेवढीच चालू असलेली फॅशन पण कळते ;-)>> हे माझ्यासाठी नवीनच. मला अजून जुन्या फॅशनही कळलेल्या नाहीत त्यामुळे नवीन कळायचं जरा अवघड आहे :-)
लेख (अर्थातच नेहमीप्रमाणे) छान......
ReplyDeleteलेख वाचून असं फार वाटतयं की माझा अनुभव इथं वाटालयाच हवा. घरापासून कॉलेजचा बसद्वारे होणारा दोन तासांचा प्रवास हा माझ्यासाठीही कंटाळवाणाच असतो. मग त्यात माझ विरंगुळे आहेत 1. झोप आणि
2. खिडकीतून बाहेर बघत पूर्वायुष्यातल्या गोष्टी, अनुभव, गमतीजमती (व केलेल्या घोडचुकाही) आठवणे. त्यातल्या आनंदाचे क्षण आठवले की, नकळत चेहऱ्यावर हसू तरळतं. बऱ्याचदा ही गोष्ट इतरांच्या कुतूहुलाचं कारण ठरते....... पण मला ही गोष्ट फार आवडते. दिवसभराच्या थकावटीनंतरचे हे क्षण मला वाळवंटातल्या पाण्यासारखे वाटतात.
एखाद्या प्रवाशाशी अचानक होणारी नजरानजर ही निश्चितच कठीण कसोटी (व वैश्विक समस्या देखील) आहे. सदर प्रकार टाळण्याचा लेखातील उपाय बहुधा जगप्रसिद्ध असावा, कारण मीही तोच वापरतो.
चला कुणीतरी आहे माझ्यासारखं निरीक्षण करणारं. मी तर सरळ चेहरेच बघत बसतो. खूप काही कळतं चेहर्यांवरून अगदी तो चेहरा रूढार्थाने एक्स्प्रेसिव्ह नसला तरी. आणि इकडे लोकलमधे गर्दीच इतकी असते की कोण काय कुणाकडे बघतंय ह्याची लोकांना काहीही पडलेली नसते!
ReplyDeleteअर्थात, निरीक्षणाचं एक स्टेल्थ आर्ट जमून गेलंय मला बहुतेक! :)
निरीक्षणांस शुभेच्छा...
आल्हादजी, लोकलमधल्या गर्दीत लोकांना काहीही पडलेलं नसतं हे मत मान्य. तुम्ही थेट चेहरे बघता तेव्हा तुम्हाला काय काय पाहायला मिळतं हे वाचायला आवडेल. तुम्ही लिहिलं आहे का त्याबाबत?
ReplyDeleteअभिषेकजी, आभार. ही समस्या वैश्विक दिसते आहे पण गंमत म्हणजे आपण सगळे जण नकळत तोच उपाय शोधतो आहोत असंही दिसतंय. आपण एक ' हौशी पादत्राणं निरीक्षण क्लब' काढायला हरकत नाही सगळ्यांनी मिळून :-)
ReplyDeleteअगदीच खास चेहरे दिसले आणि लगेच त्यावर लिहून काढलं असं अजूनतरी नाही झालेलं... पण लोकल आणि लोकलमधे भेटणारी कॅरेक्टर्स हा विषय जिव्हाळ्याचाच. ब्लॉगवरच्या दोन लिंक्स देतोय अशाच.
ReplyDeletehttp://wp.me/pxHte-3q
http://wp.me/pxHte-2z
बाकी ते नावापुढे जी वगैरे नकोच माझ्या. :)
चपला बुटांचा खेळ मीही उचलला होता तुझ्याकडून कधीतरी. सध्या हात अन बोटांकडे पाहायचा खेळ चालू आहे!
ReplyDeleteमध्यंतरी प्रवासात हातांचं (स्वत:च्या!) काय करायचं? हा तुझा प्रश्न मलाही पडला होता...
मग इतर लोक काय करतात बुवा?! असं शोधायला सुरु केलं. त्याचाच खेळ झाला. हात सुद्धा चपलाप्रमाणे बोलतात...
प्रेमळ हात, अस्वस्थ हात, झोपलेले हात...कामसू हात, आळशी हात...अनुभवी हात... स्वत:त गुंतलेले हात... सरसावलेले हात!
काय हा चाळकुटेपणा! असं एकदा मी दटावलं स्वत:ला! पण आता हे पोस्ट वाचल्यावर वाटतंय कि हरकत नाही!
गम्मतच तर आहे!
अनू, एक पोस्ट येऊन जाऊ दे मग या हातांच्या निरीक्षणावर .. बाय द वे, मलाही प्रश्न पडतो अनेकदा हातांच काय करायचं म्हणून. आणि मग काही काम नसल्याने हात विनाकारण दुखायला लागतो!
ReplyDeleteआल्हाद, दोन्ही पोस्ट आवडल्या. अजून लिहा या विषयावर. मुंबईची लोकल हे एक स्वतंत्र जग आहे!
ReplyDelete