ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, September 25, 2013

१७७. यष्टी

परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत.
गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले.
आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात.

राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात.
आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ”
“अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली.

चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता.
मान्सं तमाकू थुकत व्हती.
बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली.
ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते.

जोरात आवाज आला. डोंगरावर कायतरी चमाकलं.
“यष्टी” समदे वराडले.

आण्णा हसत व्हते.
तेस्नी मला खांद्यावर बशिवलं.
लई लई दिसांनी.


मला यष्टी आवडली. 

6 comments:

 1. Has the writer's block ended ? Happy to read this once and of course I liked the "yastee" too :)

  ReplyDelete
 2. tuzyakadun prerna gheun misuddha boli bhashet katha lihaycha prayatna kartoy... pan tuzya itka convincing lihina mla kathin vattey ahe

  ReplyDelete
  Replies
  1. कधी मिळणार आम्हाला वाचायला? वाट पाहतेय.

   Delete
 3. सविता ताई शेवटी अन्जाक्काला यष्टी आवडली ती चमकणारी पाहून, कि तिला खूप दिवसांनी अण्णांनी खांद्यावर बशिवले म्हणून… :) फार छान लिहिले आहे .

  ReplyDelete
  Replies
  1. << अन्जाक्काला यष्टी आवडली ती चमकणारी पाहून, कि तिला खूप दिवसांनी अण्णांनी खांद्यावर बशिवले म्हणून…>>
   :-)

   Delete