एका संस्थेचा
कार्यक्रम.
संस्थापकांची
जयंती. इथं तसं माझ्यासारखा एखादा अपवाद वगळता बाहेरचं कुणी नसतं.
विद्यार्थ्यांचं
संचलन. बघायला ब-यापैकी गर्दी.
आम्ही बरेच लोक
उभे. पण झाडाभोवतीच्या कट्ट्यावर काहीजण बसलेले.
मला किंचित
ढकलत आणि मग ओशाळून ‘सॉरी’ म्हणत एक आठ वर्षांचा मुलगा माझ्या पुढ्यात येऊन उभा
राहिला. मी हसून थोडी मागे सरकले.
दहा पंधरा मिनिटांचा तर कार्यक्रम.
दहा पंधरा मिनिटांचा तर कार्यक्रम.
त्याची सांगता
‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाने.
आम्ही सगळेजण
– अगदी तो आठ वर्षांचा मुलगाही- सोबत गातो. मला बरं वाटतं.
कट्ट्यावरचे
मात्र लोक बसून. उभेही राहत नाहीत.
वयस्कर?
वेगळ्या क्षमतेचे? आजारी? छे! तरुण लोक आहेत ते सगळे.
विचारांशी “बांधिलकी” असणा-या ठिकाणी हे
असं.
बांधिलकी
नसेलच – तिथं काय?
(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द- अनुभव मांडण्याचा हा प्रयोग. या मालिकेत आणखीही काही सांगण्याचा विचार आहे.)
'वन्दे मातरम'म्हणताना मनात जी आंदोलने निर्माण होतात आणि देशाभिमान जागृत होतो त्यातून आपसकच उठून उभे राहून,ह्या गीताचा मान ठेवावासा वाटतो. हे नुसतेच गीत नाही तर देशाबद्दल मनात,मनापासून जे वाटते ते आहे.
ReplyDeleteतुमच्या लेखात तुम्हीं जे म्हणालात कि कट्ट्यावरील काही मंडळी बसून होती,ह्यांना काय म्हणावे! खरे आहे..पटले.विचारांची बांधिलकी असलेल्या ठिकाणी किमान भान बाळगणे आणि एक उपचार म्हणून नाही तर मनापासून काही प्रकट करणे अतिशय महत्वाचे आहे.ह्या मंडळींच्या मनात त्या वेळी नक्की काय होते ते विचारावेसे वाटले...का ह्यांना उभे राहून गीत म्हणण्याची लाज वाटली...कि पर्वाच नव्हती कसली!
Drabble ha lekhar prakar mla mahit navhta :-) Avadla prayog:-)
ReplyDelete१०० शब्दांत अनुभव प्रयोग छान आहे…
ReplyDeleteआपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वर्षातून फक्त दोनदा वाजतं. तेव्हासुद्धा काही लोक उभे न राहता सरळ चालत राहतात किंवा निघून जातात तेव्हा वाटतं यांना काहीच वाटत कसं नाही की हे शब्दच यांच्या डोक्यात शिरत नाहीत…