सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयातील माझ्या जागेपाशी आवाज ऐकू आला. हा आवाज खारींचा आहे हे आता अनुभवाने मला माहीत झाले होते. आज सकाळीच यांचा गप्पा मारायचा, इतकेच नाही तर दंगा करायचा मनसुबा दिसतोय.. हे माझ्या लक्षात आल. बाहेर व्हरांडयात एक चक्कर टाकून त्यांच काय चाललय ते पाहाव असा विचार माझ्या मनात आला अन तितक्यात टेबलावरचा फोन खणखणला. मग कामात मी गुंतले ती गुंतलेच. मी काही फार महत्त्वाच आणि सृजनात्मक काम करते अशातला भाग नाही. पण सवयीने निरर्थक कामातही माणूस अडकत जातो. पोटासाठी अनेकदा आपण अशा कामाचे गुलाम बनतो! का असे होते ते कळत नाही, पण घडते खरे तसे! मी मुकाटयाने ही बाब ’न कळलेले’ या सदरात टाकून दिली आहे.
बघताबघता दुपारचा एक वाजून गेला. जेवणाची वेळ झाली. कार्यालयाच्या दुस-या इमारतीत कन्टीन आहे. जेवायला मला नेहमीसारखा उशीर झालेला असल्याने त्यावेळी त्या अर्ध्या मिनिटांच्या रस्त्यावर मी एकटीच होते. वाटेत दोन्ही बाजूंना बरीच झाडे आहेत. तिकडे जाताना खारीचा आवाज मला अगदी जवळून ऐकू आला. काही कामे समाधानकारकपणे हातावेगळी झाल्याने आता त्यांच्याकडे लक्ष द्यायला मला थोडी फुरसत होती. मी अर्जुनाच्या तडफेने आवाजाचा वेध घ्यायचा प्रयत्न करू लागले. आधी मला काहीच दिसले नाही. पण खारीचा आवाज मात्र येतच होता, किंबहुना आता तो जरा जास्तच जोरात येत होता.
आवाजाच्या दिशेने जात जात मी एका झाडाजवळ पोहोचले. खालच्या फांद्यांपासून सुरुवात करून मी वरती नजर फिरवत होते. लक्षपूर्वक पाहिल्यावर एका फांदीवर खारीचे एक पिल्लू मला दिसले. ते एकटेच होते. मला वाटले होते तसे अनेक खारींचा हा दंगा नव्ह्ता तर! हे एकटे पिल्लू इतका आवाज का बर करत असेल?
मी झाडाच्या जवळ जाताच ते पिल्लू आणखीनच जोरात आवाज करायला लागले. त्याला पाहून घसा ताणून ओरडणा-या आणि काही वेळा रडणा-या लहान मुलांची मला आठवण झाली. हे बहुधा हरवलेले पिल्लू होते. त्याच्या आईला ते शोधत असणार असे मला आपले उगाचच वाटले - प्राण्यांच्या आणि पक्षांच्या पिल्लांना त्यांच्या वडिलांचा आधार वाटतो की नाही हे मला माहिती नाही, हा माझा नुसताच एक अंदाज! अरे बापरे! सकाळी दहा साडेदहा वाजल्यापासून म्हणजे मागचे तीन साडेतीन तास हे पिल्लू ओरडते आहे. रडते आहे. एकटेच आहे. त्याला नक्कीच आता मदतीची गरज आहे. मी परिस्थितीकडे नीट पाहिले.
ते पिल्लू एका निमुळत्या होत गेलेल्या फांदीच्या वरच्या टोकाला होते. त्याला धड वरही जाता येत नव्हते आणि परत खालीही फिरता येत नव्हते. एक दोन फुटांवर फांदी संपत होती. आत्ताही ती फांदी किंचित वाकलेली होती आणि वा-याच्या झुळुकीने हलत होती. पाय गच्च पकडून आणि शेपटीच्या साहाय्याने त्याने कशीबशी तग धरली होती. मागे वळताना स्वतःचा तोल सांभाळता येईल अशी बहुधा त्या पिल्लाला खात्री नव्हती.
खरे तर खारीच्या त्या इवल्या पिल्लाकडे पाहताना मला माझीच स्थिती आठवली. आयुष्यात जेव्हा पुढे जाण्याचा रस्ता दिसत नाही आणि मागचेही सगळे दरवाजे बंद असतात, त्यावेळी काय वाटते हे मला अनुभवाने चांगले माहिती आहे. अशा प्रसंगी कोणी मदतीला येऊ नये अशीही इच्छा मनात असते, आपले आपण निभाऊन नेऊ असा आशावाद असतो. पण कोणी श्रेयाची अपेक्षा न करता मदत केली तर त्याचे अप्रूपही असते. मला अशा अनेक क्षणांची, प्रसंगांची आठवण त्या पिल्लाकडे पाहताना आली. कदाचित म्हणूनच खारीच्या त्या पिल्लाबद्दल माझ्या मनात ’सह- अनुभूति’ ची प्रबळ भावना दाटून आली.
अशा परिस्थितीत एरवी जे घडत तेच माझेही झाले. म्हणजे एखादी समस्या फक्त हृदयापर्यंत पोचून फारसा उपयोग नसतो, ती मेंदूपर्यंतही पोचावी लागते, तरच त्यातून मार्ग काढता येतो. त्या खारीच्या पिल्लाला नेमकी कशी मदत करावी हे मला समजत नव्ह्ते. ते पिल्लू माझी मदत मागत होते का पण? एक क्षणभरच माझी नजर त्या पिल्लाच्या नजरेत मिळाली आणि पिल्लाने मागे फिरण्याचा प्रयत्न केला. तो अर्थातच यशस्वी झाला नाही. कसाबसा स्वतःचा तोल सावरत खाली पडण्यापासून त्याने स्वतःला वाचवले. आता ते पिल्लू अधिकच जोरात ओरडू लागले. त्याचे सर्वांग थरथर कापत असलेले मला दिसत होते. ते माझ्या मदतीची अपेक्षा करत होते की ते आता मला घाबरत होते हे कळायला काही मार्ग नव्हता.
मी पायांखाली साठलेल्या पाचोळ्याचा अजिबात आवाज होणार नाही याची काळजी घेत एक पाउल पुढे सरकले. मनातल्या मनात, शब्दांविना त्या पिल्लाशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करत होते. माझ्या डोळ्यांतून माझी मदतीची भावना त्या पिल्लापर्यंत पोचेल अशी माझी भाबडी आशा होती. ’सावकाश मागे फिर, घाई करू नकोस. तुला मी खाली पडू देणार नाही, माझ्या ओजळीत मी तुला झेलेन, तू पडणार नाहीस...’ असे काहीबाही मी मनोमन त्या पिल्लाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. माझी सद्भावना त्या पिल्लापर्यंत पोचेल, ते सुखरूप मागे फिरेल असे मला आपले उगाचच वाटत होते.
पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. माझ्या कृतीमुळे ते पिल्लू आणखी भयभीत झाले. ते जिवाच्या आकांताने ओरडू लागले. प्राणी, पक्षी, वनस्पती अत्यंत तरलपणे आपल्याला स्वीकारल्याचा अथवा नाकारल्याचा संदेश देतात. तो सूक्ष्म असतो पण अत्यंत स्पष्टही असतो. माणसेही खरे तर या भावना आपल्याप्रर्यंत पोचवतात पण जसजसे वय वाढते तसतसे त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका बेरकीपणा आपल्या सर्वांकडे येतो.
खारीच्या या पिल्लाने माझी मदत नाकारताना मलाही नाकारले होते. ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्ह्ते. मी हळूहळू मागे सरकले. कदाचित त्या पिल्लाची आई जवळच असेल आणि मी समोर असल्याने ती मदतीला येत नसेल, अशी मी स्वतःची समजूत घातली. मी मागे फिरताच पिल्लाचा कंप कमी झाला, आवाजाचा जोरही थोडा कमी झाला. मी शांतपणे त्या जागी थांबले. माझ्या श्वासाचाही आवाज येऊ नये इतकी मी स्तब्ध होते. क्षणभर मी डोळे मिटले. पण मला काही सुचेना. त्या क्षणी मी पूर्णपणे रिक्त होते. पिल्लाची गोठलेली नजर अजून माझ्यावर खिळलेली होती. त्याला माझी भीती वाटत होती हे आता मला स्वच्छ समजत होते.
मी आणखी मागे सरकले. घाई न करता वळले. विचारमग्न अवस्थेत मी कन्टिनमध्ये गेले. त्या पिल्लाला माझे जवळ असणे आश्वासक वाटण्याऐवजी भीतीदायक का वाटले असावे हे मला समजत नव्हते. त्याचा आणि एकंदरच झाल्या प्रसंगाचा अर्थ शोधत मी दोन घास कसेबसे पोटात ढकलले. काही मिनिटांतच मी परत त्या झाडापाशी होते.
आता तेथे पूर्ण शांतता होती. कसलाही आवाज नव्हता, कसलीही हालचाल नव्हती. खारीच्या पिल्लाचा मागमूसही नव्हता. फक्त ते झाड आणि मी असे दोघेच होतो. ते झाडही जणू स्वतःच्या विचारांत मग्न होते, आपण त्या गावचे नसल्याच्या थाटात ते उभे होते. काय झाले त्या पिल्लाचे? त्याची आई त्याला घेऊन गेली? की ते खाली पडले? की आकाशात हिंडणा-या एखाद्या घारीचे ते शिकार बनले? मी चहूकडे नजर टाकली. कशाचीही खूण नव्हती. काहीही वेगळे दिसत नव्हते. सगळे जणू नेहमीसारखे होते. ते पिल्लू वेदनेने तळमळत होते? की ते खेळत होते? की ते स्वतःच्याच नादात होते? मी त्या पिल्लाला तशीच सोडून गेले हे बरोबर केले? की ती टाळता येण्याजोगी चूक होती? पिल्लाला माझ्याबद्दल विश्वास वाटावा यासाठी मी नेमकी काय काळजी घ्यायला हवी होती? मी त्याला कशी मदत करायला हवी होती? आता ते आनंदात असेल का?
खरेच पाच मिनिटांपूर्वी असे एखादे खारीचे एकटे आणि हतबल पिल्लू येथे होते? की हा सारा मला झालेला भास?
आणखी एका गूढाची भर पडली आयुष्यात! सत्य मला कधीच कळणार नाही! नेमके काय घडले, ते का घडले, ते टाळता येण्याजोगे होते की नव्हते, पर्याय काही होता की नाही …. ते सारे काही असेच ’न कळलेले’ या सदरात राहणार तर आयुष्यभर!
*
Saturday, January 2, 2010
Tuesday, December 29, 2009
१५. काही कविता: ७ प्रवाही
तशी ही वर्षाअखेरची कविता वाटावी असेच तिचे शब्द आहेत. ती कदाचित जीवनाअखेरची कविता असेल असं म्हणायला मी धजत नाही, कारण मी नेहमी कविता लिहीन याची मला कधीच खात्री वाटत नाही. प्रत्येक कविता लिहून झाल्यावर 'अरे वा! आपण अजूनही कविता लिहू शकतो’ हे जसं समाधान असतं, तशीच 'ही कदाचित शेवटचीच कविता असणार नाही ना’ अशी एक भयावह शंका पण मनात असते.
कधी वरवर पाहता सगळं काही संपून गेलं आहे असं वाटत असतानाच 'अजून शब्द आहेत जागे आत’ याची अचानक सुखद जाणीव होते. उजाड भासणा-या जमिनीत पावसाच्या एका सरीने लाखो अंकुर तरारून यावेत त्याच धर्तीचा हा चमत्कार असतो. निसर्गाचं आणि मनाचं मला अद्याप न उलगडलेलं हे एक कोडंच! नाहीतर ऐन मे महिन्यात मला अशी जगण्याच्या निरंतर सुरेल प्रवाहाची जाणीव का बरं व्हावी?
जाउ द्या! मी आपली समीक्षकाच्या भूमिकेत शिरायला लागले तर नकळत!
पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;
पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वहात आहे;
जे झाले , ते गेले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;
तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!
९ मे २००८ प्रवासात

Monday, December 7, 2009
१४. तुझे माझे धागे
जगताना अनेक अनुभव येतात. खरं तर ते सगळ्यांनाच येतात या दुनियेत. पण फक्त कवीच अशा अनुभवांना नेमक्या शब्दांत पकडतात. यातून दोन प्रकारच्या प्रक्रिया घडतात असं मला वाटतं.
एक म्हणजे अत्यंत व्यक्तिगत असा अनुभव (तो नेमका कवीचा स्वतःचाच असायला पाहिजे अशी गरज अर्थातच नाही) सार्वजनीन बनून जातो. म्हणजे जी जी व्यक्ती या विशिष्ट प्रकारच्या अनुभवातून गेली असेल, तिला तिचा अनुभव शब्दबद्ध केला आहे असं वाटतं.
दुसरं म्हणजे कविता वाचताना दुस-या कोणाचातरी अनुभव नकळत आपला होऊन जातो. तो आपल्याला आला नसला तरी त्या अनुभवाबद्दल एक जागा मनात निर्माण होते.
कदाचित या दोन्ही प्रक्रिया वाचकाच्या मनात एकाच वेळी घडतात, त्यात श्रेणीबद्धता असतेच असं नाही. हो. आणि आणखी एक. हे फक्त दुःखाच्या भावनेबाबत घडतं असं नाही, ते सुखाच्या बाबतही घडतं.
वासंती मुझुमदारांची ही कविता वाचताना मला असाच काहीसा अनुभव येतो. हातातून निसटलेले कितीतरी क्षण आठवतात. काही नकळत निसटले तर काही कळत असतानाही काही करता आलं नाही. गंमत म्हणजे अशा निसटलेल्या क्षणांचे दुःखही कालांतराने नाहीसं होतं. जे चिरंतन आहे असं वाटत असतं ते सर्व क्षणजीवी ठरतं. काही बदलेलं नाही तरी हळूहळू सारं काही बदलत जातं जगण्याच्या प्रवाहात! मग अट्टाहास मागे पडतो. समांतर रेषांच्या वाढत जाणा-या अंतराचा स्वीकार होतो स्वतःसमवेत.
तुझे माझे धागे
कधी
नाही वाटे जुळायचे;
नाही अमा-पॊर्णिमेने
रंग माझे पुसायचे.
चाललेल्या मुकेपणी
रेषा दोन समांतर ;
श्वास रोधियेला तरी
राही वाढत अंतर.
वासंती मुझुमदार
’सहेला रे’ काव्यसंग्रहातून
Monday, November 23, 2009
१३. काही कविता: ६ ग्वाही
कविता लिहिणं - ही ज्यावर आपलं कसलंही नियंत्रण नसतं अशी कृती आहे. किंबहुना ती एक स्वतंत्र अशी प्रक्रिया असते, ती एक पूर्ण घटना असते. कधीकधी त्याचं मर्म हाताशी येतं, तर कधी ते निसटून जातं. आणि मागे उरते ती फक्त एक गुदमरवणारी अस्वस्थता.
लिहिणं आणि न लिहिणं यापैकी कोणताही पर्याय निवडला तरी - तो परिस्थितीनुसार निवडावाही लागतो अपवादात्मक वेळी - त्याचा परिणाम एकच असतो. तो म्हणजे काहीतरी मिळवल्याची आणि ते गमावल्याची क्षणिक का असेना पण तीव्र भावना.
सगळयाच कवींना अस वाटत असेल असा माझा अजिबात दावा नाही.
कदाचित याच्या पूर्ण विरोधी असाही मुद्दा मी कधीतरी लिहिन.
कवितेचा आणि तर्काचा logic चा संबंध क्वचितच असतो म्हणून कदाचित मनासारख्या गोष्टीवर आपण असंख्य ओळी लिहू शकतो आणि तरी ते ओळखीचं होतंच नाही बेटं!
श्वास अर्ध्यातच
थांबतो कधीकधी,
हे नको, तेही नको
म्हणतॊ, शोध पर्याय काही....
लटपटते मन, शरीर
यांची साक्ष अटळ
आणि दुनियादारीत
फक्त दुःखाचीच ग्वाही....
पुणे, ३० नोव्हेंबर २००८

Tuesday, November 17, 2009
१२. कंजूष
काही माणसं स्वभावतःच कंजूष असतात. पैसे वाचविण्याच्या आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या विविध युक्त्या त्यांना सुचत असतात. "वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा' असला भक्कम सुविचार कोणातरी कंजूष माणसाला सुचला असणार, असं आपलं मला नेहमी वाटत आलंय. सहजतेनं खर्च करणाऱ्या व्यक्तीला असला विचार सुचणं प्रथमदर्शनी अशक्य वाटतं; पण कोणास ठाऊक, कायमच कंजूष माणसासोबत राहताना कोणालातरी हे समजलं असेल.
तुम्हा आम्हा सर्वांच्याच वाट्याला अशी एक तरी कंजूष व्यक्ती आलेली असतेच. कॉलेजच्या जीवनात आपल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात एखादा कंजूष नमुना हमखास असतो. कधी त्याची/ तिची परिस्थिती बिकट असते म्हणून किंवा कधी त्याच्या/ तिच्यामुळे मनोरंजन होतं म्हणून; कधी नाईलाजानं, तर कधी खुशीनं त्याला/ तिला सामावून घेतलं जातं. त्यात देण्याघेण्याचा हिशोब नसतो.
केवळ परिस्थिती नसते म्हणून माणसं पैसे खर्च करत नाहीत, असा माझा बराच काळ समज होता. पदवी हातात पडल्यावर मी एका सेवाभावी संस्थेत पूर्ण वेळ काम करायला लागले. त्या काळात मागेपुढे न पाहता इतरांसाठी भरपूर खर्च करणारी असंख्य माणसं मी पाहिली. स्वतःकडे जे काही असेल, त्यातलं सर्वोत्तम दुसऱ्यांसाठी देणारी अशी माणसं पाहताना मी बरीच वर्षे "कंजूष' हा शब्दही विसरून गेले होते. त्या काळात लोकांनी मला लाडावून ठेवलं, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आपण स्वतः पैसे कमावत नाही, असा कमीपणा मला तेव्हा कधीही वाटला नाही.
पैसे मिळवायची गरज कधी भासली नाही. जवळ असलेले सगळे पैसे एका क्षणात इतरांसाठी खर्च करताना भविष्याची काळजी मला आजही वाटत नाही. गरज लागेल तेव्हा दुसरं कोणीतरी आपल्याला पैशांची उणीव भासू देणार नाही, अशी मला नेहमी खात्री वाटते - कोणाकडे काही मागण्याचा माझा स्वभाव नाही, तरीही मला असं वाटतं हे विशेष!
तोवरचं माझं काम एका ध्येयानं बांधल्या गेलेल्या गटासोबत, लोकांसोबत होतं. आपापसांत कितीही वैचारिक किंवा रोजच्या कामासंबंधी मतभेद असले, तरी एकमेकांची काळजी आम्ही सहजतेनं घ्यायचो. एक तीळ सात जणांत वाटून घ्यायचा, इतकंच नाही, तर वेळप्रसंगी आपण उपाशी राहून उरलेल्या दहांना तो तीळ आनंदानं खाऊ घालायचा, अशा वातावरणात मी अनेक वर्षं जगलेच वाढले.
यथावकाश मी पैसे मिळवायच्या फंदात पडले आणि एक पूर्णतः नवं अनुभवविश्व सामोरं आलं.
एकदा मुंबई सेंट्रल स्थानकावरून अहमदाबादला जाणारी गाडी पकडायची होती. आम्ही पाच-सहा जण होतो. पुण्यातून निघून आम्ही साडेअकराच्या सुमारास मुंबई सेंट्रलला पोचलो. आमच्या पुढच्या गाडीला अजून दोन तासांचा वेळ होता. मॅकडोनाल्डमध्ये खाण्यापेक्षा बाहेर उडुपी हॉटेलात यायला आम्ही बाहेर पडलो- आमचं सामान भूक नसणारा एक सहकारी सांभाळत बसला. आम्ही पाच जणांनी पाच वेगळे पदार्थ खाल्ले. वेटरने विचारायच्या आधीच मी "एकत्रच बिल कर' असं त्याला सांगितलं. त्या समूहात मी एकटीच स्त्री होते म्हणून असेल कदाचित; पण वेटरनं माझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या हातात बिल दिलं. बिल तसं काही जास्त नव्हतं. शिवाय माझे ते सहकारी अधिकारानं वरिष्ठ होते. त्यांना पगारही भरपूर होता. आणि मुख्य म्हणजे बिल कोणीही दिलं तरी कार्यालयीन कामासाठी आम्ही जात असल्यामुळे शेवटी तो "अधिकृत' खर्च होता. या सर्व गोष्टींमुळे मी पैसे देण्याची फार पराकाष्ठा नाही केली.
हॉटेलपासून स्टेशन केवळ सात मिनिटांच्या अंतरावर. चौकात सिग्नलला आम्ही थांबलो, तेव्हा माझे सहकारी मला म्हणाले, ""सविता, तुमचं सतरा रुपये बिल झालं.'' त्यांनी इतरांनाही अशाच रकमा सांगितल्या. मी इतकी चकित झाले होते, की मला काही सुचेना. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. त्यामुळे "स्टेशनवर पोचल्यावर दिले तर चालतील ना? की आत्ता लगेचच देऊ?'' एवढंच मी विचारू शकले.
मग मला अशी माणसं भेटण्याची सवय झाली. म्हणजे कोणी आपल्याला पेरू खायला दिला आणि तासाभरानं त्या पेरूचा एक रुपया मागितला, तर मला आश्चर्य वाटेनासं झालं. खाताना भरपूर गप्पा मारणारा माणूस नेमका बिल द्यायच्या वेळी मोबाईलवर बोलत बसणार, हे मी स्वीकारलं. फळं आपण आपल्या पैशांनी घ्यायची आणि कोणीतरी दुसरं कोणा तिसऱ्याला "ही तुमच्यासाठी भेट' म्हणून देणार आणि फुकटचं औदार्य मिरवणार, याचा राग येण्याऐवजी गंमत वाटू लागली. घरातून आणलेले पदार्थ गुपचूप हॉटेलच्या खोलीत एकट्यानं खाऊन मग वर "अहो, प्रवासात मला फारशी भूक लागत नाही' असं म्हणणाऱ्यांची कीव येऊ लागली. सामूहिक प्रवासात "मला हिशोब ठेवणं चांगलं जमत नाही, तू कर आता खर्च, नंतर देईन मी,' अशा युक्त्यांची नवलाई मागे पडली. एकदा तर पाच हजारांची रक्कम मी खर्च केली. त्याची पावती परस्पर दुसऱ्यानंच क्लेम केली. "मी विसरलेच होते, तू दिलेस पैसे ते' - अशी नंतरची सारवासारव हास्यास्पद होती.
आपण पैसे खर्च करू शकत नसलो, तर कमावण्याला तरी काय अर्थ- असं म्हणत बिल कार्यालयीन खर्चात पडणार असो की नसो, मी पैसे देत राहते. आपल्यासोबत असणाऱ्या सर्व माणसांसाठी खर्च करण्याची जबाबदारी माझी आहे, असं मला वाटतं- भले, मग माझ्याजवळ उद्यासाठी पैसे असोत वा नसोत!
परवा बाहेरगावी असेच एक गृहस्थ भेटले. दोन-तीन वर्षं आम्ही एकत्र काम केल्यामुळे त्यांचा कंजूष स्वभाव मला माहिती होता. सकाळी आम्ही हॉटेलच्या स्वागतकक्षापाशी भेटलो, तेव्हाच मी त्यांना "संध्याकाळी एकत्र जेऊ' असं आमंत्रण दिलं. त्यांनी त्या शहरात एका घरगुती खानावळीचा शोध लावला होता, तिकडे जाऊ जेवायला असं त्यांनी सुचवल्यावर आम्ही तिकडे गेलो. जेवताना त्यांच्या नव्या नोकरीबाबत बोलणं झालं. त्यांना तिथं भरपूर जास्त पगार होता. काम कमी होतं आणि पुरेसे अधिकार होते. त्यामुळे गृहस्थ एकंदर खुशीत होते. मला बरं वाटलं ते मजेत आहेत ते पाहून.
जेवण झालं. मी काउंटरवर जाऊन दोघांचेही पैसे द्यायला लागले. या गृहस्थांच्या कंजुषीची इतकी ख्याती आहे, की "गेल्या पंचवीस वर्षांत यानं आम्हाला एकदाही चहा पाजलेला नाही," असं त्यांचे मित्र सांगतात. अशा माणसाला तरीही मित्र असतात, याहून नवलाची आणखी काय गोष्ट असू शकते? असो. त्यामुळे या गृहस्थांनी माझ्या जेवणाचे पैसे द्यावेत वगैरे काही विचार माझ्या मनात नव्हते.
"नाही, मॅडम, तुम्ही नका पैसे देऊ,'' असं ते गृहस्थ म्हणाल्यावर 'अच्छा, म्हणजे माणसांचे स्वभाव बदलतात तर...' असं मला वाटलं; पण जुना अनुभव गाठीशी असल्यामुळे केवळ औपचारिकपणानं ते असं म्हणत असावेत, असा मी अंदाज बांधला. "अहो, तुम्ही पैसे देणार हे आधी माहिती असतं, तर जरा महागड्या हॉटेलात नसतो का गेलो आपण,'' अशी पुस्ती त्यांनी जोडली, तेव्हा यांचा आज पैसे खर्च करण्याचा निश्चय दिसतो आहे, असं मला वाटू लागलं.
हे काहीतरी वेगळं घडत होतं तर नेहमीपेक्षा! पण कदाचित मला भास होत असेल, असं वाटून मी शंभरच्या दोन नोटा काउंटरवरच्या माणसाकडे सरकवल्या. हॉटेलमधल्या माणसांची- वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत- एक गंमत असते. पुरुष सोबत असल्यावर स्त्रीनं पैसे देणं किंवा खरं तर स्त्रीकडून पैसे घेणं यांना अत्यंत अपमानाचं वाटतं. एकदा अशाच एका प्रसंगी एका वेटरनं तर मला भारतीय संस्कृतीवर एक लंबंचौडं भाषण दिलं होतं. गार्गी, मैत्रेयी अन्य ऋषिगणांबरोबर जलपानासाठी जात असतील, तेव्हाही ऋषिगणांपैकी पुरुषांनीच आवश्यक त्या सुवर्णमुद्रा देण्याचा आश्रमांचा, गुरुकुलांचा नियम होता, असं या वेटरचं भाषण ऐकल्यावर बराच काळ मला वाटत होतं. अभ्यासकांनी यावर जरूर संशोधन केलं पाहिजे.
तर इथंही त्या काउंटरवरच्या माणसानं मला रोखलं. "ताई, साहेब असताना तुमच्याकडून पैसे घेणं प्रशस्त नाही वाटत. देताहेत ना साहेब पैसे.'' ही आता आणखी एक गंमत. अशा कोणत्याही प्रसंगात मी 'ताई' असते आणि माझ्याबरोबरचा पुरुष असतो 'साहेब'! त्या हॉटेलवाल्याला त्याचं बिल मिळण्याशी मतलब; कोणी का देईना, त्याला काय करायचं? पण एक तर ही घरगुती खानावळ होती. दुसरं म्हणजे त्या वेळी जेवणाऱ्यांची फारशी गर्दी नव्हती. तिसरं म्हणजे तिथं जेवायला आलेली मी बहुतेक अपवादात्मक बाईमाणूस होते; कारण त्या अर्ध्या-पाऊण तासात तिथं जेवायला आलेल्या प्रत्येक इसमानं आश्चर्यानं माझ्याकडे पाहिल्याचं माझ्या लक्षात आलं होतं.
"मॅडमकडून घेऊ नका हो पैसे,'' गृहस्थांचा खरंच बिल द्यायचा विचार होता तर! नव्या वातावरणात नवीन काही शिकलेले दिसताहेत ते. मी या माणसासाठी इतक्या वेळा आजवर पैसे खर्च केले होते, की एखाद्या वेळी त्यांनी पैसे दिल्यानं फार काही बिघडत नव्हतं. मी स्वस्थ उभी राहिले.
त्या गृहस्थांनी पैसे दिले. "साहेब, अजून वीस रुपये.'' काउंटरवरचा माणूस म्हणाला. आपले हे महाशय हसून शांतपणे म्हणाले, "तुम्हीच उलट मला चाळीस रुपये परत द्या. मॅडमचे पैसे मॅडम देतील.''
काउंटरवरच्या त्या माणसाचा चेहरा अगदी तोंडात मारल्यासारखा झाला. मी मुकाट्यानं पैसे दिले, तेव्हा त्यानं माझ्याकडे पाहिलंही नाही. कोपऱ्यात उभी राहून इतका वेळ शांतपणे सगळं बोलणं ऐकत असलेली एक स्त्री पदराआड तोंड लपवून हसत होती. मी तिच्याकडे पाहून स्वच्छ, साधी हसले आणि ती एकदम जोरजोरात हसायला लागली. काउंटरवरच्या माणसानं जरा काळजीनं आधी तिच्याकडे मग माझ्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तोही मोठ्यानं हसला आणि एकदम गप्प झाला.
आम्ही बाहेर पडलो. हे गृहस्थ म्हणाले, "जरा विचित्रच वाटले ते नवरा-बायको. काही कारण नसताना असं हसायचं म्हणजे...''
त्यावर मी पण मोठ्यानं हसले. म्हटलं, ""झाली असेल काहीतरी गंमत. तुम्हाला नसेल कळली कदाचित.''
मी त्या गृहस्थांना ओळखणाऱ्या एकांना हा किस्सा सांगितल्यावर ते म्हणाले, ""म्हणजे आता इतक्या वर्षांनंतर हा बाबा स्वतःचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला तरी शिकलाय. या आयुष्यात ही फारच मोठी झेप झाली त्याची.''
आणि खदाखदा हसत हे "शुभ वर्तमान' इतर मित्रांना सांगण्यासाठी त्यांनी मोबाईल हातात घेतला.
पू्र्वप्रसिद्धी : सकाळ, सप्तरंग, Sunday, November 15, 2009

Wednesday, November 11, 2009
११. काही शोधायाचे नाही
’चैत्रपुनव’ या १९७० साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहातील ही कविता.
कवी आहेत अर्थातच बा.भ. बोरकर.
ही कविता वाचताना माझाही सारा शोध अलगद संपून जातो. जणू सगळं विश्व कवेत असल्याची निर्लिप्त अन तरीही अतीव समाधानाची भावना ओसंडून वाहण्याचा अनुभव या शब्दांच्या सोबतीने मी घेते!
काही शोधायाचे नाही:
सारे इथेच येणार
काही मागायाचे नाही:
माझा हातच देणार.
दिठी उलटली आत
प्राणा लागले पाझर
आता घागरीत भरे
सारा रूपाचा सागर
नाही बोलायचे काही:
मौन निळाईत गाते
दळी चांदण्याचे पीठ
हातावीण माझे जाते
Monday, November 2, 2009
१०. काही कविता: ५
एखादी व्यक्ती एखादं काम अनेक वर्षांपासून करत असेल आणि त्या व्यक्तीला त्या कामाबद्दल विचारल्यावर धड काही सांगता येत नसेल, तर तुम्ही तिला काय म्हणाल?
मी या प्रसंगात दुस-या बाजूला आहे, कारण अशी एक गोष्ट आहे की जी अनेक वर्षे करूनही मला तिच्याबद्दल काही नीटपणे सांगता येणार नाही.
मी अर्थातच कविता लिहिण्याच्या प्रक्रियेबाबत बोलते आहे.
कवितेचा अर्थ 'कवी’च्या जीवनात शोधण्याचा प्रयत्न केवळ समीक्षक करतात असं नाही, तर सर्वसामान्यपणे बहुतेक माणसं करतात. त्याला कंटाळून मी कविता इतरांना वाचायला देणं अनेक वर्षे बंद केलं होतं. मला ओळ्खणा-या असंख्य माणसांना मी कविता लिहिते हे माहितीही नाही.
आता त्यादिवशीचे उदाहरण घ्या. माझ्यासाठी तो अगदी एक सर्वसामान्य दिवस होता. दिवसभरात काहीही विशेष घडलं नाही. कार्यालयातून आल्यावर घरातल्या घरातच मी अर्धा तास चालते. माझ्या त्या फे-या चालू होत्या. अचानक माझा श्वास थांबला. मी टेबलावरचा कागद पेन घेतला आणि काही ओळी लिहिल्या. पाच मिनिटांत मी पूर्ववत माझं चालणं सुरू केलंही होतं.
हे शब्द आले कुठून? ते का आले? ते येणार हे मला आधी माहिती होतं का? मी नेमकं असंच का लिहिलं? येणारे शब्द कागदावर न उतरवण्याचं स्वातंत्र्य मला आहे का? मी शब्दांना 'या’ असं आवाहन करू शकते का?
यातील एकाही प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही. आणि मी तीस वर्षांपूर्वी पहिली कविता लिहिली होती. आहे ना गूढ गंमत?
आता मी प्रसिद्ध कवी नाही म्हणून ठीक! नाहीतर या कवितेचा कुणी काय काय अर्थ लावला असता हे पाहणं मनोरंजक ठरलं असतं.
असो.
तर ही कविता.
दुःख सरण्याचे नाही,
दुःख हरण्याचे नाही,
कळ धुम्मस मनात,
दुःख विरण्याचे नाही.
दुःख मातले थोडेसे,
दुःख आतले थोडेसे,
वसा विरक्तीचा घेता,
दुःख बेतले थोडेसे.
काही उणे, बाकी दुणे,
जगण्याचे ताणेबाणे,
थेंब पावसाचा नाही,
आणि पीक सोळा आणे.
भग्न काळोखली रात,
जन्म पारखले सात,
घाव झेलून पडता,
मंद थरथरे हात.
दाही दिशा सुप्त शब्द,
मालक हा मुक्त शब्द,
देह मनाला सांधतो,
ताणलेला तृप्त शब्द!
पुणे २७ ऑक्टोबर २००९ २०.००
Subscribe to:
Comments (Atom)