ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, October 28, 2010

५०. काही कविता: १४ नाळ

वेताळाची
हाक येथे
झटकून उगाच
सोंग आण:

आणलेस? ठीक.

निसटून गेले
मर्म जरी
प्रपाताच्या माथी
चार बुक्के हाण;

हाणलेस? भले.

संदर्भांच्या
नागमोडी दगडांआड
विसरून ये एकदा तरी
रसरसले पंचप्राण;

विसरलेस? आता पुढे.

उरलेसुरले लक्तरांचे
शब्द घेऊन
खोल गुहेत बुडवून टाक
लवलव जाण.

जमले इतके? ग्रेट.

आता काय?
काही नाही.
कशाचीच
घाई नाही.

रुतून येथे
जाऊ नको;
हाती कोणाच्या
येऊ नको;
मागे वळून
पाहू नको;
गुंतून कोठे
राहू नको.

डोळे उघडून
पेलून ने हे
अपरंपार मायाजाळ
तोडता तोडता
जुळवून  तीच नाळ.


वांसदा, गुजरात ९ सप्टेंबर २००४ २३.००

4 comments:

  1. >>डोळे उघडून
    पेलून ने हे
    अपरंपार मायाजाळ
    तोडता तोडता
    जुळवून तीच नाळ.

    हे फार फार आवडलं! :)

    ReplyDelete
  2. कमलेशजी , आभार आणि स्वागत. कवितेला कोणी दाद दिली की त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे आजवर मला कधीच कळलेलं नाही :-)

    ReplyDelete