ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, February 15, 2014

१८९. वाचननोंदी: १

मी वाचलेल्या पुस्तकांची अगदी थोडक्यात माहिती सांगतेय. मुख्य हेतू स्वत:साठी नोंद ठेवणं असा आहे. वाचकांना यातून काही चांगली पुस्तकं सापडली तर आनंदच आहे.

जानेवारी २०१४

१.   व्हय, मी सावित्रीबाई – सुषमा देशपांडे (पानं ५७)

सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा एकपात्री प्रयोग श्रीमती सुषमा देशपांडे गेली पंचवीस वर्ष करत आहेत. त्या एकपात्री प्रयोगाची ही छोटेखानी संहिता वाचनीय आहे. यातून फुले दाम्पत्याच्या कामाचे नवे पैलू तर कळतातच, शिवाय ज्या परिस्थितीत त्यांनी काम केलं आणि ते करतानाचे त्यांचे संघर्ष यांचीही माहिती होते. प्रयोग बोली भाषेत सादर केला जातो, संहिताही त्याच भाषेत आहे. ही भाषा वाचायला मस्त वाटते.  

2 . A Tale of Two CitiesCharles Dickens  (पानं २३७)

या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल मी नव्याने काही सांगायची गरज नाही. माझ्यासाठी “All time great” मध्ये या पुस्तकाचा सहज सामावेश व्हावा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मानवी मनाची आंदोलनं सांगणारं, शेवटपर्यंत उत्सुकता खिळवून ठेवणारं एक सुंदर पुस्तक.

पुस्तकाच्या सुरुवातीचा एक परिच्छेद – मला अतिशय आवडतो म्हणून इथं देतेय.

It was the best of times; it was the worst of times.
It was the age of wisdom; it was the age of foolishness.
It was the epoch of belief; it was the epoch of incredulity.
It was the season of the Light; it was the season of Darkness.
It was the spring of hope; it was the winter of despair.
We had everything before us, we had nothing before us.
We were all going direct to Heaven, we were all going direct the other way –

In short, the period was so far like the present period, that some of its noisiest authorities insisted on its being received, for good or for evil, in the superlative degree of comparison only. 

3. Gospel of Sri Ramkrishna: Mahendranath Gupta (पानं ३२२)

पूर्वी वाचलेलं पुस्तक. परत एकदा वाचावं असं.

महेंद्रनाथ गुप्त (एम) रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य. मूळ बांग्ला भाषेतल्या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद. हे रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र नाही. यात आहेत रामकृष्ण परमहंस यांचे विविध संवाद - जे एम यांच्यासमोर घडले, त्या संवाद-संभाषणांच्या नोंदी. ही संभाषणं वाचताना रामकृष्ण परमहंस यांचे तत्त्वज्ञान, त्यांची विचारप्रणाली तर कळतेच' पण त्याहून अधिक स्पष्ट कळतो तो त्यांचा (त्या तत्त्वांच्या अनुषंगाने) होणारा व्यवहार. विवेकानंद रामकृष्ण यांना एवढे  का मानतात हा प्रश्न मला पडला होता, त्याचं उत्तर ही संभाषणं वाचून कळतं. 

विचारांचा साधेपणा, सोपी अभिव्यक्ती, समोरच्याला समजतील अशी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं - आणि त्यासोबत असलेली वैचारिक स्पष्टता; उदारमतवादातून आलेली लवचीकत आपण मूल्याशी कसलीही तडजोड नाही; लहान मुलाचा निरागसपणा  आणि उपजत शहाणपण ... असे रामकृष्णांचे विविध पैलू उलगडत जातात आणि मी चकित होते - पुन्हा एकदा. 

दोन संभाषणं बघा ही उदाहरणादाखल. 

एकदा ईश्वर सगुण आहे की निर्गुण अशी चर्चा चालू आहे. भक्त/शिष्य आपापली मतं सांगताहेत. रामकृष्ण म्हणतात: There is no harm in looking at Him from this or point of view. Yes, yes, to think of Him as Formless Being is quite right. But take care you do not run away with the idea that that view alone is right and all others are false.

जगात आपल्या वाट्याला आलेली कामं पूर्ण निष्ठेने करावीत पण त्यात गुंतून जाऊ नये, आपलं चित्त नेहमी ईश्वरचरणी असावं हे सांगताना ते म्हणतात: A rich man's maid-servant will do all her duties, but her thoughts are always set upon her own home. Her master's house is not hers. She will, indeed, nurse her master's children as if they were her own, saying often "My own Rama', 'My own Hari' . But all the times she knows full well the children are not hers. 

विद्वत्ता आणि शहाणपण; माहिती आणि अनुभव, वक्तृत्वकला आणि संभाषण - अशा अनेक गोष्टींबाबत आपली मतं किती वरवरची आहेत याची जाणीव हे संवाद वाचताना होत राहते. 

वाचलं आहे हे पुस्तक? नसेल तर नक्की वाचा. 

4. Life Beyond Death: Swami Abhedananda  (पानं २४०)

   हे पुस्तक माझ्या संग्रहात कधी आणि कसं आलं (म्हणजे कुणी दिलं, का मी विकत घेतलं) हे आठवत नाही. पुस्तकाच शीर्षक पाहून बरीच वर्ष पुस्तकाला हात लावला नव्हता. पण याच लेखकाची 'गीता प्रवचने' मला आवडली होती. पुस्तक संग्रहात ठेवायचं की नाही याचा एकदा काय तो निर्णय घ्यावा म्हणून अखेर हे पुस्तक वाचायला घेतलं. 
   
   आधुनिक विज्ञान आणि Spiritualism (मराठी प्रतिशब्द सुचला नाही) याचा आढावा घेत पुस्तकाला सुरुवात होते. 'मृत्यूनंतर जीवन असते'  याविषयी प्राचीन समजुती (बायबल, इजिप्त, हिंदू, पारशी इत्यादी) काय होत्या हे सांगितल्यावर याविषयी विज्ञानाचा दृष्टिकोन लेखक सांगतात. या संदर्भात 'मृत आत्म्याशी संवाद घडण्याचे' स्वत:चे आणि इतरांचे अनुभव लेखक सांगतात तेव्हा मी शंकित झाले होते. 
   
   पण एकंदर वेदान्त दर्शनाचा आधार घेत स्वामीजी म्हणतात: आत्मा मरत नाही, तो अनादि-अनंत आहे; शरीर नष्ट पावते. आत्म्याला पुन्हा दुस-या कुणाच्या माध्यमातून परत माघारी बोलावू नये; कारण त्यामुळे त्याच्या पुढच्या प्रवासास बाधा येते. 
   
   खरं सांगायचं तर या पुस्तकातले सगळेच विचार मला पटले नाहीत, पण सगळे टाकून देण्याजोगेही वाटले नाहीत. त्यामुळे तूर्त हे पुस्तक संग्रहात ठेवायचं, पुन्हा एकदा कधीतरी वाचायचं असं ठरवलं आहे. 
   
   अरे हो, स्वामी अभेदानंद यांच्याबद्दल थोडी माहिती. ते रामकृष्ण परमहंस याचे शिष्य होते. अनेक वर्षे त्यांनी अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये वेदान्त विचारांच्या प्रसाराचे काम केले. १९०१ (०२?) मध्ये कॅलीफोर्निया युनिवर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट दिली होती. त्यांचा जन्म १८६६ मधला आणि १९२१ मध्ये त्यांनी देह ठेवला. 

*  **
   वाचननोंदी: २ 


4 comments:

 1. सावितादी आपली ही नोंद ठेवायची कल्पना आवडली …

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. अशाच इतरांच्याही नोंदी वाचायला मिळतील ही आशा :-)

   Delete
 2. नोंद ठेवण्याची कल्पना छान आहे. कितीतरी वेळा विषय, पुस्तकातली एखादी व्यक्तीरेखा मनात घर करुन राहिलेली असते पण पुस्तकाचं नाव विसरुन जायला होतं.
  व्हय मी सावित्री व्यतिरिक्त काही वाचलेलं नाही मी. life beyond ने उस्तुकता चाळवली आहे. वाचायला हवं. आई अचानक जाईपर्यंत कधी या विषयाबद्दल विचारही केला नव्हता.

  ReplyDelete
  Replies
  1. << पुस्तकातली एखादी व्यक्तीरेखा मनात घर करुन राहिलेली असते पण पुस्तकाचं नाव विसरुन जायला होतं. >> पूर्ण सहमत मोहना. शिवाय मला तेच पुस्तक पुन्हा वाचायची सवय आहे आणि दरवेळी पुस्तकं नव्याने कळत जातात असा अनुभव येतो. त्या कळण्याचा मागोवा घ्यायचा हा एक प्रयत्न. आणि इतरही लोक अशा नोंदी ठेवता असतील/ठेवतील - त्या वाचायला मिळतील अशी आशा.

   Delete