ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, September 3, 2010

४२. काही कविता: १३: लगाम

लगाम आवरून धरत
दुस-या हाताने
एकमेकांत अस्ताव्यस्त गुंतलेली
सारी मुळे
नीट केली मी,
आणि वळून पाहत
जणू प्रथमच तुझ्याकडे
मी म्हटले:
हं! आता बोल.


पण तू
काहीच म्हटले नाहीस
आजतागायत.


आता हे देखील
नेटाने
आवरून धरणे
क्रमप्राप्त आहेच तर!

नाशिक ३० सप्टेंबर २००६ ०१.२०

2 comments:

  1. मी सुमारे अर्धा तास काय प्रतिक्रिया द्यावी हा विचार करत होतो!
    पण कधी कधी कविता नुसतीच अनुभवावी हे बरं!

    ReplyDelete