खर तर खूप काही लिहिण्यासारख आहे.
मी नव्या गावात आहे.
नव्या वातावरणात आहे.
नवीन माणस भेटताहेत.
जुन्या गोष्टी मागे पड़ल्यात.
जुन्या भावना, जुनी स्वप्ने परकी होऊन गेली आहेत.
कालचे आज काही उरत नाही हा अनुभव पुन्हा एकदा येतो आहे.
पण त्याचबरोबर नव्या जगाचे कुतुहलही आहे.
अजून फारशी स्वप्ने नाहीत ... पण ती काय कधीही सुरु होऊ शकतात! ते सांगायचे आहे...
पण...
एक मोठा पण आडवा येत आहे.
आजवर नेहमी मी बरहा इमे वापरता होते. सवय त्याचीच झालेली. आता संगणक दुस-याचा , तेथे नेहमीचा सवयीचा फॉण्ट नाही. दोन तीन इ -मित्रानी माझी मदत केली आहे आवश्यक माहिती तातडीने मला देउन. पण....
आपल्या सवयी बदलणे किती अवघड असते याचा मला प्रत्यंतर येतो आहे.
एखादा शब्द टाइप करायला जमला की आनंदही होतो आहे.
केले की जमते, करायची इच्छा मात्र हवी हेही समजते आहे.
नव्या पद्धतीने काही शब्द टाइप करायला अवघड जाते आहे..
पर्यायी सोपे शब्द शोधण्याची प्रक्रिया मनात लगेच सुरु होते आहे.
त्या नादात जे काही सांगायचे त्यापेक्षा दुसरेच काही व्यक्त होत आहे.
आपल्याला प्रश्नात अडकून राहणे आवडत नाही .. वाट शोधणे चालू राहते आतल्या आत हे लक्षात येउन बरेही वाटते आहे.
एक नवा अनुभव .. एका अर्थी पाहिले तर बाहेरच्या जगात बदल..
पण त्याच्या सोबत जगताना. त्याकडे नीट पाहताना आपण आतही किती बदलत आहोत, बदललो आहोत ते जाणवते.
अशी बदलत बदलत मी कधीतरी मूळ पदावर तर जाउन पोचणार नाही ना? अशी भीती नाही वाटत... पण कोठे जाउन पोचणार त्याचा अंदाज बांधता येत नाही.
आयुष्यात अशी अनिश्चितता असावी त्यातच खरी मजा असते
परिस्थितीला शरण जाणे आणि परिस्थितीला सामोरे जाणे या दोन बाबी एकसारख्या नाहीत असे मी मला सांगते आहे.
यात समंजसपणा किती आणि अपरिहार्यता किती?
माहिती नाही.
असे मला बदलायचे होते का पण?
माहिती नाही.
पण हा बदल मी स्वीकारला आहे .. तो मीच जाणीवपूर्वक आणला आहे.
आता मराठी पोस्ट लिहायला अवघड जाणार थोड़े इतके सोडले तर बाकी काही 'पण' नाही.

छोट्या छोट्या गोष्टींतून बर्याचदा जीवनातल्या एखाद्या मोठ्या तत्वज्ञानाची जाणीव होते ती अशी..
ReplyDeleteविचारप्रवाह खूपच छान वर्णन केलात तुम्ही!
नवीन पोस्ट बघून बरं वाटलं. ह्म्म्म खरंच अवघड आहे. जुन्या सवयी सोडणं आणि नवे बदल स्वीकारणं हे अवघड खरंच आणि तेही सर्वस्वी नव्या वातावरणात..
ReplyDelete[मला कोणी गुगल इमे सोडून इतर कुठलं मराठी अँप्लिकेशन वापरायला सांगितलं तर चांगलंच कठीण जाईल :)]
सवय बदलावी लागली आणि तो बदल आपण जाणीवपुर्वक स्वीकारलात ना.आता सगळ सुरळीत होइल...माझ्याकडे सुद्धा खुप वेळा ’ पण का’ हया माझ्या प्रश्नाच उत्तर ’ माहीत नाही’ हेच असत...असो...बाकी तुमची लेखन शैली खरच आवडली.
ReplyDeleteविद्याधर, आभारी आहे. बरेचदा छोटया गोष्टीच आपल्याला खूप काही शिकवतात!
ReplyDeleteहेरम्ब, हा एक नवा प्रयोग .. जमतोय बहुधा :-)
दवबिंदू, ' आणि तो बदल आपण जाणीवपुर्वक स्वीकारलात ना.आता सगळ सुरळीत होइल...' हे तुमचे शब्द वाचून खूप बर वाटल! मी नेहमीचा काहीतरी नव करत असते आणि त्याचा आनंदही घेत असते.. पण तरीही तुमचे शब्द दिलासा देउन गेले.
यंत्रा वरचे अक्षर तेच
ReplyDeleteआकडे तेच,
उमटवायची तर्हा वेगळी ;
मन साशंक होतं,
जमेल कि नाही ?
मग वाटतं
अनेक शतकां पूर्वी
घातलेल्या कपड्या निशी
आईची शिदोरी घेउन
कुठलाच रस्ता माहित नसताना
कोकणातून
एक मुलगा निघाला
अनेक जंगलं, नद्या , डोंगर
ओलांडून
श्वापादांशी दोने हात करून
मन घट्ट करून
आपलाच रस्ता तयार करून
झटून काम करायला
आणि शिकायला
मुंबई-पुण्याला आला .....
आपलं काम किती सोपं वाटतं न आता ?
सुरंगाजी, आपली वाट त्यामानाने फारच सोपी आहे हे तुमच मत अगदी पटल मला!
ReplyDelete