ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, February 7, 2012

११२.नेहमीचेच

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. मी मेट्रोतून येत असताना एक दहा वर्षाचा मुलगा आणि त्याची आई माझे सहप्रवासी होते.
दहा वर्ष म्हणजे काही 'समज नसणारं' वय नाही मानता येणार आजच्या काळात.
तो मुलगा त्याच्या घाण बुटांसह सीटवर उभा राहून वरच्या कड्यांना लोंबकळत होता.
दोन मिनिटे झाली, तीन झाली ..

पाच मिनिटांनी मी त्या मुलाला म्हटलं, "बेटा, इस सीटपे आगे लोग बैठेंगे. आप गंदे शूज रखकर उस सीटपर खडे मत रहना, सीट गंदा हो रहा है वह ..."
मी हे शांत समजुतीच्या स्वरांत बोलले, कारण 'मूल लहान आहे, मी मोठी आहे' याच मला भान होत.

त्यावर त्या मुलान लगेच मला दरडावून सांगितलं, "इस सीट पे मेरा नाम लिखा है'.
मला एकदम त्याने माझ्या कानफाटात मारल्यासारखं वाटलं. तरीही मी हसून पुन्हा म्हटलं, "बहुत तेज दिमाग है आपका ..."

त्याच्या आईने त्याला जरा दटावलं अस बोलण्याबद्दल - 'ऐसा मत बोलना' असं ती म्हणाली. पण घाण बूट त्या सीटवर ठेवण्याबाबत काहीच नाही.

आसपासच्या स्त्रियांनी माझ्याकडे अपेक्षेन पाहिलं. आता भांडण रंगणार, काहीतरी करमणूक होणार अशी त्यांची अपेक्षा होती बहुतेक.

मी शांत राहिले. एका मर्यादेपलिकडे डोक भिंतीवर आपटण्यात काही अर्थ नसतो हे मला माहिती आहे.

माझ्या मनात आलं -  हे पोरग पुढे काय प्रकारचं नागरिक बनणार हे स्वच्छ दिसतच आहे. अशा प्रसंगी आई-वडिलांची, अन्य पालकांची भूमिका काय असावी? काय असते साधारणपणे?

आपली फक्त 'बघ्यांची' भूमिका असावी? का आपण प्रयत्न करावा बदल घडवून आणण्याचा? ते करताना कटुता कशी टाळायची? स्वतःला मनस्तापापासून कस अलिप्त ठेवायच?
हे खरे तर नेहमीचेच .. म्हणून मीही निर्ढावले आहे का या सगळ्याला?

काय वाटतय इतरांना?

पूर्वप्रसिद्धी:  http://mimarathi.net/node/8076 

9 comments:

  1. दिल्लीला मी खूप पूर्वी गेलेले आहे. आता मात्र मी आपल्या राजधानीविषयी माझ्या मैत्रिणीकडून भीतीदायक गोष्टीच ऐकलेल्या आहेत. मी विचारात पडले की 'दिल्ली'त असते तर काय केलं असतं ? सांगता येत नाही. बहुतेक मी माझे 'सुंदर' पाय उचलून त्याच्या/त्याच्या आईच्या बॅगेवर ठेवले असते व तोंड वर करून सांगितलं असतं...'इसपे मेरा नाम लिखा है !"
    खात्री नाही पण. 'एका मर्यादेपलिकडे डोक भिंतीवर आपटण्यात काही अर्थ नसतो'...हे खरंच आहे. आणि आता ही मर्यादा फारच जवळ आलीय.

    ReplyDelete
  2. सविता मनस्ताप होतो... खूप होतो. तू म्हणतेस ते किती खरं आहे तुला काय सांगू . रोज...अगदी रोज हे असं काहीतरी पाहावं लागतं :(

    ReplyDelete
  3. अनघा आणि श्रीराज, मनस्ताप तर होतोच क्षणिक का होईना. दिल्ली काय आणि मुंबई काय; खेडी काय आणि शहर काय .. माणसं सगळीकडे भेटतातच असली!

    ReplyDelete
  4. मन कितीही शिवशिवले तरी काही वेळा संयमच हाती धरलेला बरा! :)

    कदाचित मुलाला न सांगता त्याच्या आईला हे सांगितले असते तर... कारण शेवटी मुलाचे वर्तन ही पुनरावृत्ती असू शकते. ( हे विधान सरसकट लागू नाही. आईने खून केलेला नसूनही मुल करू शकते. पण हे एक्स्ट्रिम टोक झाले. )

    ReplyDelete
  5. sad state of affairs...I too see this everywhere....public sector...private sector...dilli mumbai london....sagli kade tech...accountability shoonya pan haq poora chahiye

    ReplyDelete
  6. सगळीकडे तेच आहे हे खरंच. पण त्या बाबतीत कधी आणि काय करता येईल ह्या बाबतीत मात्र त्या त्या शहरानुसार फरक पडतो. म्हणजे हे मुंबईत घडलं तर वेगळा प्रतिसाद आणि दिल्लीत घडलं तर वेगळा...नाही का ?

    ReplyDelete
  7. भाग्यश्री, मी नेमका उलटा विचार केला. आई सोबत असून काहीच म्हणत नव्हती त्या मुलाला, त्याचा अर्थ उघड होता. मला वाटलं, मुलाच्या संवेदनशीलतेला आवाहन करण त्यामानान सोप जाईल. पण कसचं काय!!

    ReplyDelete
  8. रेनड्रॉप, हो असं आहे खर ...

    ReplyDelete
  9. अनघा, केवळ शहरानुसार नाही तर आपल्या परिस्थितीनुसार (रोजचे आहे की पाहुणे आहोत, इतर व्यवधान काय आहेत, वेळ आहे का, मूड कसा आहे ..) यावरून पण आपली प्रतिक्रिया बदलते - जे स्वाभाविक आहे आणि योग्यही आहे. पण सगळीकडे हे घडते - फक्त दिल्लीला नावं ठेवून आपल्याला निवांत बसता येणार नाही इतकचं मला म्हणायचं होत - जे मला वाटत की तू ही म्हणते आहेस.

    ReplyDelete