ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, April 10, 2014

१९६. मद्दान

“शाळा नाही आज, मतदान आहे,” आय म्हन्ली.
त्ये काय असतंय बगाया लगी साळत.

पोलिसमामाबी व्हते.
राती आमच्यातच आल्ते जेवाया. हसले; जा म्हन्ले आत.

मोटी मान्सं येकेक आत यणार. मंग म्हाडिक गुर्जी कागुद बग्णार.
मोहिते गुर्जी शै लावनार; येक कागुद देणार त्यास्नी.
मान्सं गपचिप खोक्यात कागुद टाकून जाणार.. ठप्प करत.

आण्णा बसलेले छातीला बिल्ला लावून.
म्या म्हन्लं, “मलाबी कागुद; शै; बिल्ला.”
आण्णा म्हन्ले, “जा घरी.”

बापूकाका आले. म्या बोल्ली “शै.”

बापूकाका आण्णांना म्हन्ले, “बाळ्याच्या मेल्या म्हातारीचं नावं आहे यादीत मास्तर. होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!”

आण्णा लटलट कापत व्हते.
मला वराडले, “जा मुकाट घरी."

आण्णांना बापूकाकांचं भ्यावं वाटलं?
मद्दान लई वंगाळ.

*शतशब्दकथा 

6 comments:

 1. आन्जी इज ब्याक!

  कोणी प्रकाशकाने आन्जी-कथांचं एक कॉफी टेबल बुक काढावं. दोन पानांवर एक कथा. डाव्या पानावर कथेची रेखाचित्रं, उजव्या पानावर डोकावून बघणार्‍या खट्याळ डोळ्यांच्या झिपर्‍या आन्जीचा वॉटरमार्क आणि त्यावर इंपोज केलेली शतशब्दकथा. शक्यतोवर शाळकरी हस्ताक्षरात.

  मजा आ जायेगा.

  मी पहिला कष्टंबर.

  - आदूबाळ (मिपा)

  ReplyDelete
 2. मद्दान लई वंगाळ......................ह्म्म्म.........

  ReplyDelete
 3. ह्म्म्म.............................

  ReplyDelete