ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, March 13, 2010

२४. काही कविता: १० वेगळा

सुरूवात, शेवट
सारे तेच, तसेच
फक्त मध्य
तुमचा आमचा
सर्वांचा वेगळा;

पडदा वर आहे
तोवर धावपळ
देह रसरसता राखण्यासाठी
मनही हवे जिवंत
म्हणून पसारा सगळा!


कलंदर ईशत्वाला
सहज सोबत घेऊन
थिरकली पावले
शून्यत्व निमाले
भास उरला सगळा.

’एको॓Sहम" तू म्हटलेस
पण नाही म्हटले मी
’बहुस्यामः’ चुकून एकदा
म्हणून जन्म हा असा
सुखाचा, तरीही वेगळा!!

आहवा, (गुजरात)७ डिसेंबर २००६ १३.००

2 comments:

  1. अहाहा.. सुंदर. पहिली दोन कडवी तर खूप म्हणजे खुपच आवडली !!!

    ReplyDelete
  2. तुमच्या प्रतिक्रियेच्या उत्स्फूर्ततेबद्दल धन्यवाद :)

    ReplyDelete