ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, May 12, 2013

१६६. फुस्स ...


दत्तुमामा आलेत.
म्हंजे आमच्या आत्याचा नवरा.

आमच्या तीन आत्या.
एक पुन्याची. हे तिचे नवरे.
दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं.
तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई.
म्या तिला बघिटलीचं न्हवं.

दत्तुमामा खाऊ आन्तेत.
म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला.
आय चा करत व्हती.
म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया.

दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?”
दर बारीला हेच विचारतेत.
दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते.
आताशिक सकरात आली जवळ.
मंग आताबी पयलीतच –हाणार की!

म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला”
दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”.

येकदम फुस्स !
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!

5 comments:

 1. अगदी खरंय हे, बऱ्याचदा बरेच जण नुसतंच विचारतात... कधी कधी मी सुद्धा...

  ReplyDelete
 2. :D असे किती दत्तू मामा आपल्या आजूबाजूला असतात न!!

  पोस्ट मस्तच !!!

  ताविस, मला कधीतरी असे वाटते अशा सध्या सरळ गोष्टीच बऱ्याच वेळा वाचकाला अंतर्मुख करतात...नाही!?

  ReplyDelete
 3. या चिमुरडीचं नाव ठेव बाई काहीतरी!
  दरवेळी काहीतरी धडा शिकवून जाते...
  फारच गोड आहे!
  :D

  ReplyDelete